शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बैठक व्यवस्थेतील बदलामुळे व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 18:11 IST

बुलडाणा: स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याला लागून असलेली दुकाने हटविल्याने बुलडाण्याच्या कपडा मार्केटमध्ये बैठक व्यवस्थेवरून व्यापाºयांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.

बुलडाणा: स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याला लागून असलेली दुकाने हटविल्याने बुलडाण्याच्या कपडा मार्केटमध्ये बैठक व्यवस्थेवरून व्यापाºयांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. कमी जागेत आणखी अस्थायी दुकाने आल्याने आपसी वाद होऊन येथे गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. परिणामस्वरुप पंचक्रोषीत प्रसिद्ध असलेल्या या कपडा मार्केटीची आर्थिक उलाढाल रोडावली आहे.आठवडी बाजाराच्या दिवशी स्टेट बँक चौक ते न्यायालय इमारतीपर्यंतच्या परिसरात हे कपडे विक्री करणाºयांची अस्थायी दुकाने बसायची. परंतू लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता या परिसरातील ही दुकाने काही कालावधीसाठी अन्यत्र हलविण्याबाबत सुचीत करण्यात आले होते. मात्र त्याचे योग्य नियोजन न झाल्यामुळे सध्या उपरोक्त गोंधळाला सामोरे जावे लागत आहे. रविवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी बुलडाण्यातील कपडा मार्केटमध्ये दुरवरून नागरिक खरेदीसाठी येतात. घाटावरील मेहकर, लोणार सिंदखेड राजा, चिखली, घाटाखालील मोताळा, मलकापूर, खामगाव त्याचबरोबर मराठवाड्यातील भोकरदन याठिकाणावरूनही काही लोक खरेदी विक्रीसाठी बुलडाणा येथे येतात. सध्या लग्न सराईचे दिवस असल्याने बुलडाण्याच्या रविवारच्या बाजारातून साड्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. अनेक लोक तर बुलडण्याच्या बाजारातून खरेदी केलेला कपडा गावोगावी विक्री करतात. त्यामुळे प्रत्येक रविवारला कपडा विक्रीमध्ये लाखोंची उलाढाल याठिकाणी होते. परंतू सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील कपडा मार्केट हटविण्यात आलेले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी असल्याने लोकसभा निवडणुकीच्या कामात कुठलाही व्यत्यय येऊ नये, यासाठी या परिसरातील सर्वच दुकाने हटविण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या न्यायालच ईमारत चौक, कारंजा चौक याठिकाणी कपड्याची दुकाने लावली जातात. परंतू या ठिकाणी दुकाने जास्त व जागा कमी झाल्याने मोठ्या अडचणी वाढल्या आहेत.   बाजारात वाढले वादरविवारच्या बाजारामध्ये काही दुकानदारांना जागाच मिळाली नसल्याने रस्त्यावर हातगाड्या उभ्या केल्या जातात. तर काहींनी इतर दुकानाच्या जागेवरच अतिक्रम केलेले आहे. त्यामुळे बाजारामध्ये वादाच्या घटना वाढल्या आहेत. या बाजारात एखादे वाहन आल्यास किरकोळ अपघाताच्या घटनाही घडत असल्याचा प्रकार ३१ मार्च रोजी समोर आला. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMarketबाजार