शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संसर्गात वाढ; सतर्कता गरजेची- सुमन चंद्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 18:26 IST

वाढते संक्रमण पाहता मृत्यू रोखण्याचे आव्हान  असून संक्रमण रोखण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात सध्या कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. लॉकडाऊन दरम्यान प्रशासकीय पातळीवर आरोग्य विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य दिले गेले. आता वाढते संक्रमण पाहता मृत्यू रोखण्याचे आव्हान  असून संक्रमण रोखण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे. आपत्कालीन स्थितीसाठी जिल्ह्यात आॅक्सीजन सिलींडरची संख्या वाढविण्यात येत आहे. तसेच लोणार सरोवर विकास आराखड्याच्या संदर्भाने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र कोरोना संसर्गामुळे काही उदिष्ठ साध्य करता आले नाहीत, मात्र सरोवर विकासासंदर्भात प्रशासन कटीबद्ध असल्याची भूमिका जिल्हाधिकारी सुमन चंद्रा  यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केली. 

वाढते कोरोना संक्रम रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत. ?कोरोना संक्रम सध्या वाढत आहे. त्यादृष्टीने त्रिस्तरीय रचनेमध्ये कोवीड केअर सेंटर, कोवीड हेल्थ सेंटर व डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल अशी रचना आपण केली असून त्यात जवळपास चार हजार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. 

लॉकडाऊन काळात आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या का?हो,लॉकडाऊन काळात आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. देशाच्या एकूण जिडीपीच्या अवघा चार टक्के खर्च हा आरोग्य क्षेत्रावर होतो. कोरोना संसर्गामुळे तो वाढविण्यात आला असून बुलडाणा जिल्ह्यातही पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे. टाटा ट्रस्टच्या माध्यमातूनही डेडीकेटेड कोवीड रुग्णालय उभे राहत असून १५ जुलै पर्यंत येथील कामे पूर्ण होतील.

कोरोना संक्रमणाची जिल्ह्यात सध्या दुसरी लाट आली आहे का?नाही. जिल्ह्यात कोरोनाची फस्ट स्टेजच आहे. त्यामुळे दुसºया लाटेचा प्रश्न अद्याप नाही. आपण शुन्यावर आलो होतो. परंतू स्थलांतरीत स्वगृही परतल्याने त्यांच्यासोबत काही संक्रमीत व्यक्तीही आल्या व त्यातून जिल्ह्यात संक्रमण वाढले. ते नियंत्रीत ठेवण्याचे प्रयत्न आहेत.

लोणार सरोवर विकासाबाबत नेमकी स्थिती काय?लोणार सरोवर विकास आराखड्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात आहे. त्याचे नियोजनही झाले आहे. परंतू कोरोना संसर्गामुळे त्यात काही प्रमाणाच अडचणी आल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार येथील कामाला प्राधान्य देण्यात येत आहे. सरोवर संवर्धन व परिसर विकासासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात आलेले आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे त्याची प्रभावी अंमलबजावणी करता आली नाही. मात्र जिल्हा प्रशासन गुणात्मक व दर्जेदार काम या ठिकाणी करण्यासाठी कटीबद्ध आहे.

 सीएसआर फंडातूनही जिल्ह्याला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मदत होत असून ओएनजीसीकडून लवकरच जिल्ह्यात आणखी आॅक्सीजन सिलींडर येत आहेत. जिल्ह्यात  कोरोनामुळे सात मृत्यू झाले आहेत. कोरोना संसर्गाची फस्ट  स्टेज सध्या पिकींगला आहे. मलकापूरची स्थिती नियंत्रीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  कोवीड संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात त्रिस्तरीय रचनेच्या माघ्यमातून प्रयत्न सुरू असून आॅक्सीजन सिलींडरची संख्या वाढवत आहोत- सुमन चंद्रा

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखतcorona virusकोरोना वायरस बातम्या