यावेळी उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय गायकवाड, आ. अमित झनक, सत्तजित अर्बनचे अध्यक्ष श्याम उमाळकर, महेश अर्बनचे अध्यक्ष गोपाल मोदानी, राजेंद्र आखाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार, जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती राजेंद्र पळसकर, पं.स. सभापती नीता देशमुख, माजी सभापती ॲड. सुरेशराव वानखेडे, न.प. गटनेते संजय जाधव, बळीराम मापारी, जालिंदर बुधवत, सुरेश वाळूकर, खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव रहाटे, माजी सभापती निंबाजी पांडव यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी संस्थेची कार्यप्रणाली विशद केली. कार्यकारी संचालक वीजेंद्रकुमार धोंडगे यांनी प्रास्ताविकात माहिती विशद केली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष पंजाबराव मेटांगळे, नीरज रायमुलकर, अंबादास सास्ते, नारायण काबरा, शिवशंकर तेजनकर, शालिक ढवळे, नागेश सोनुने, तोताराम गारोळे, शंकर ठाकूर, पंजाबराव धांडे, डॉ. अंकित धोंडगे, राजेश मानघाले यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. (वा.प्र.)
डोणगाव येथे शारंगधर अर्बन शाखेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:38 IST