शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदांना फक्त वेतनासाठी अनुदान, इतर भत्ते देणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:21 IST

निकड लक्षात घेऊनच निधी खर्च करावा, असे निर्देश ग्रामविकास विभागाने ५ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी होत असलेल्या खर्चामध्ये काटकसर करून शक्यतोवर इतर भत्ते, प्रवास खर्च अदा करताना निकड लक्षात घेऊनच निधी खर्च करावा, असे निर्देश ग्रामविकास विभागाने ५ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासाठी निधी मंजूर केल्याचे पत्रही देण्यात आले.राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या महामारीच्या परिस्थिती आर्थिक संकट निर्माण झाले. त्यामुळे राज्य शासनाने २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात जून अखेरपर्यंत अनिवार्य व कार्यक्रम खर्चाच्या एकुण वार्षिक तरतुदीच्या केवळ १५ ते २५ टक्क्यांच्या मर्यादेतच निधी वितरण करण्याचे बंधन घातले. अनिवार्य खर्चामध्ये वेतनासाठी यापुढे शिल्लक असलेल्या निधीच्या मर्यादेत निधी मुख्य कार्यकारी यांना देण्याचा आदेश ५ आॅगस्ट रोजी दिला आहे. हा निधी खर्च करताना नियंत्रक अधिकाºयांनी काटकसर करावी, तसेच त्या निधीतून प्राथम्याने मासिक वेतनावर खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.दरम्यान कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अर्थकारण प्रभावीत झालेले असून प्रारंभी वित्त विभागाने एक परिपत्रक काढून आर्थिक शिस्त जपण्याचा प्रयत्न केला होता पण आता चार महिन्याच्या कालावधीनंतर कोरोना संसर्गाने अर्थकारणाला दिलेल्या फटक्याचे या माध्यमातून दृश्य परिणाम समोर येत आहेत.

आवश्यक तेवढेच अनुदान मिळणारजिल्हा परिषदेला आॅगस्टमध्ये वेतनासाठी अनुदान देताना त्यासोबत अटी व शर्तीही लावण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदांनी या खर्चाचे स्वतंत्र लेखे ठेवणे, ज्या प्रयोजनासाठी अनुदान मिळाले, त्यासाठीच खर्च करणे, दरमहा आवश्यक तेवढ्याच अनुदानाची मागणी करण्याचेही बजावले आहे.

इतर भत्ते, प्रवास खर्चावर टाचविशेष म्हणजे, मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी निधी मंजूर करताना याबाबत पुढील आदेश होईपर्यंत वेतन फरकाची देयके, वैद्यकीय संबंधित देयके, वैद्यकीय कारणास्तव घेतलेल्या रजा, रजा कालावधीतील मासिक वेतन यासंदर्भात निकड लक्षात घेऊनच निधी मंजूर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावBuldhana ZPबुलढाणा जिल्हा परिषद