शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य  तक्रारींचा  तात्काळ निपटारा करावा -  जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 20:30 IST

लोकशाही दिनाची कार्यवाही दर महिन्याच्या पहिल्या सोमवारला होत असते. यासाठी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर  तक्रारी येत असतात. लोकशाही दिन कार्यवाहीच्या कक्षेत न येणा-या तक्रारींना सामान्य तक्रारी म्हणून संबंधित विभागांकडे पाठविल्या जातात. संबंधित विभागाकडून अशा तक्रारींवर त्वरित निपटारा करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज दिल्या

ठळक मुद्देकार्यवाहीच्या कक्षेत न येणा-या तक्रारी पाठविल्या जातात संबंधित विभागांकडे लोकशाही दिनामध्ये एकूण २० तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी १२ तक्रारी अन्य विभागांकडे पाठविण्यात आल्या

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लोकशाही दिनाची कार्यवाही दर महिन्याच्या पहिल्या सोमवारला होत असते. यासाठी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर  तक्रारी येत असतात. लोकशाही दिन कार्यवाहीच्या कक्षेत न येणा-या तक्रारींना सामान्य तक्रारी म्हणून संबंधित विभागांकडे पाठविल्या जातात. संबंधित विभागाकडून अशा तक्रारींवर त्वरित निपटारा करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज दिल्या.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकशाही दिनाच्या कार्यवाहीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराज, अतिरिक्त पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, भूमि अभिलेख अधिक्षक श्री. जधवर, तहसीलदार शैलेश काळे, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या लोकशाही दिनामध्ये एकूण २० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी लोकशाही दिन कार्यवाहीसाठी ८ तक्रार स्वीकृत करण्यात आली. तसेच १२ तक्रारी सामान्य तक्रार म्हणून अन्य विभागांकडे पाठविण्यात आल्या. तसेच तीन तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तहसीलदार शेगांव, महावितरण व कार्यकारी अभियंता सार्व. बांधकाम विभाग खामगांव यांच्याकडील तक्रारींचा समावेश आहे.  लोकशाही दिन कार्यवाहीला जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.