शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो विहिरींच्या कामात गैरप्रकार; आणखी चार शेतक-यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:49 IST

मोताळा(बुलडाणा) : तालुक्यातील आडविहीर येथे रोहयो अंतर्गत सुरू असलेल्या विहिरीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आडविहीर येथील दोन शेतकºयांनी ६ एप्रिलपासून शेतात उपोषण सुरू केले होते. दरम्यान, उपोषणाच्या पाचव्या दिवशी मंगळवारी आणखी चार शेतकरी या उपोषणात सहभागी झाले आहेत. त्यामुळे उपोषणाची व्याप्ती वाढली आहे. शेतकºयांनी चक्क शेतातील विहिरीसमोरच हे उपोषण सुरू केलेले आहे.

ठळक मुद्दे काम अर्धवट अवस्थेत

मोताळा(बुलडाणा) : तालुक्यातील आडविहीर येथे रोहयो अंतर्गत सुरू असलेल्या विहिरीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आडविहीर येथील दोन शेतक-यांनी ६ एप्रिलपासून शेतात उपोषण सुरू केले होते. दरम्यान, उपोषणाच्या पाचव्या दिवशी मंगळवारी आणखी चार शेतकरी या उपोषणात सहभागी झाले आहेत. त्यामुळे उपोषणाची व्याप्ती वाढली आहे. शेतकºयांनी चक्क शेतातील विहिरीसमोरच हे उपोषण सुरू केलेले आहे.      आडविहीर येथील शेतकरी राजेंद्र भागवत पाटील यांच्या शेतात रोहयो अंतर्गत विहिरीचे काम सुरू होते. संबंधित अधिका-यांनी गैरकारभार करून संपूर्ण कामाची देयके काढली; मात्र काम पूर्ण केले नाही. कागदोपत्री विहीर पूर्ण दाखवून देयके काढण्यात आल्याचा आरोप शेतकºयांनी केला.  कमलबाई बारसू नारखेडे यांच्या शेततळ््याबाबतीतही असाच प्रकार घडला आहे. ५० फूट कामाच्या विहिरीचे फक्त २५ खोदकाम करून काम अर्धवट अवस्थेत आहे. रोहयोच्या कामात असाच भ्रष्टाचार सुरू असल्याचे समजते. राजेंद्र भागवत पाटील व नीलेश बारसू नारखेडे या दोघा शेतकºयांचा उपोषणाचा मंगळवारी पाचवा दिवस होता. दरम्यान, अनेक मान्यवरांनी उपोषणाला भेटी दिल्या; मात्र प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने उपोषण सुरूच आहे. मंगळवारी माजी सभापती शरदचंद्र पाटील, माजी सरपंच श्रीकृष्ण नारखेडे, सामाजिक कार्यकर्ते गजानन खाचणे, मनोहर  नारखेडे यांनी सदर उपोषणाला पाठिंबा जाहीर करून उपोषणात सहभागी झाले. त्यामुळे आता एकूण सहा जण उपोषण करीत आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली.  

टॅग्स :buldhanaबुलडाणा