शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

अंढेरा परिसरात वाढले अवैध धंदे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

अवैध रेती वाहतूक, अवैध देशी दारू ठिकठिकाणी खुलेआम विकली जाते. या सर्वांवर कुठलीच कारवाई न करता, बीट जमादार यांच्याकडून ...

अवैध रेती वाहतूक, अवैध देशी दारू ठिकठिकाणी खुलेआम विकली जाते. या सर्वांवर कुठलीच कारवाई न करता, बीट जमादार यांच्याकडून सतत पाठीशी घातले जात असल्याचे दिसून येते. गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीने सगळीकडे थैमान घातले असून, जिल्हा प्रशासन कडक अंमलबजावणी करण्यात व्यस्त असते. जिल्ह्यात लाॅकडाऊन सुरूच आहे. अंढेरा येथे सायंकाळी चार वाजता स्थानिक बीट जमादार प्रतिष्ठाने बंद करतात, परंतु काही प्रतिष्ठाने सुरूच असल्याने, जी प्रतिष्ठाने बंद करण्यात आली, त्या मालकांनी २१ जुलै रोजी सायंकाळी होत असलेल्या भेदभावाबद्दल व्यथा मांडली आहे. या संदर्भात स्थानिक बीट जमादार यांना विचारणा केली असता, चार वाजता बस स्टॉपवरील सर्व प्रतिष्ठाने बंद केली, परंतु आम्ही पोलीस स्टेशनमध्ये परतल्यानंतर जर कोणी प्रतिष्ठाने उघडत असतील, तर पोलीस काय करणार, असे सांगितले.

प्रत्येक दुकानदारांना वेगवेगळे नियम कसे?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद करण्याचे नियम प्रत्येक दुकानदाराला वेगवेगळे कसे, असा प्रश्न काही स्थानिक दुकानदारांनी उपस्थित केला आहे. पोलिसांकडूनही काही दुकाने वेळेत बंद ठेवण्याबाबत तंबी दिल्या जातात. तर काही दुकाने सुरूच राहतात.

तक्रारकर्त्यांनी मला कुठली व कोणाची प्रतिष्ठाने उघडी आहेत, त्यांची नावे सांगावी, मी कारवाई करतो. - गजानन वाघ, बीट जमादार, अंढेरा