देऊळगावराजा (बुलडाणा) : निवडणुक काळामध्ये अवैध देशी दारूचा साठा देऊळगावराजा पोलिसांनी १३ ऑक्टोबरच्या रात्री जप्त केला.या कारवाईमध्ये पोलिसांनी १४ हजार ८00 रूपयांचा माल जप्त केला. दे.राजा पोलिसांनी आजवर आचारसंहीतेचे ३ गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत प्राप्त माहिती अशी की १३ ऑक्टोबर रोजी अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती ना.पो.काँ.गणेश शेळके यांना मिळाली. त्यानुसार ठाणेदार हिवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून ग्राम पिंपळनेर शिवारामध्ये अवैध दारूचा साठा जप्त केला. या कारवाईमध्ये दोन बॉक्स देशी दारू तथा मोटारसायकल जप्त करण्यता आली. या प्रकरणी मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ ई, ७७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तर विधानसभा निवडणुकीमध्ये आचारसंहीता भंगप्रकरणी कलम १८८, १७१ (ग), लोकप्र ितनिधी कायदा अन्वये विविध पक्षावर तीन गुन्हे आतापर्यंत दाखल करण्यात आले आहे.
निवडणूक काळात १५ हजार रुपयांची अवैध दारू जप्त
By admin | Updated: October 15, 2014 00:41 IST