शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

खडकपूर्णातून अडीच दलघमी पाण्याची अवैध उचल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 17:15 IST

खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याची चोरी होत असल्याची ओरड असून, २६ दलघमी मृतसाठ्यापैकी अडीच दलघमी पाण्याची चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: दीड दशकातील तीव्र अशा दुष्काळाचा सामना करणार्या बुलडाणा जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या देऊळगाव राजा तालुक्यतील संत चोखा सागर अर्थात खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याची चोरी होत असल्याची ओरड असून, २६ दलघमी मृतसाठ्यापैकी अडीच दलघमी पाण्याची चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.दरम्यान, पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील प्रकल्पामधील जलसाठा हा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवल्याच्या पृष्ठभूमीवर मध्यंतरी जिल्हयात पाण्याच्या चोरी प्रकरणी आठ प्रकरणात कारवाई केली असून सहा प्रकरणात थेट पोलिसांत गुन्हे दाखल केले आहे. या संपूर्ण कारवाई दरम्यान कृषीपंपाचे २५० स्टार्टर्स व मोठ्या प्रमाणावर केबल जप्त केली असल्याचे पाटबंधारे विभागातील सुत्रांनी स्पष्ट केले आहे. आॅक्टोबर २०१८ अखेरच जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता शहरी तथा ग्रामीण भागातील योजनांच्या पाणीपुरवठ्यासाठी ३६.४ दलघमी पाणी आरक्षीत करण्यात आले होते. सोबतच पाण्याची चोरी होत असल्यास संबंधितांवर प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी त्यावेळी परिस्थितीचे गांभिर्य पाहता दिले होते. त्या पृष्ठभूमीवर पाटबंधारे विभाग, महसूल विभाग व महावितरणचे कर्मचारी सतर्क होऊन त्यांनी प्रकल्पांच्या परिसरातील बॅकवॉटरमधून पाण्याची चोरी करणार्यांविरोधात कारवाईचा सपाटा लावला होता.यामध्ये लोणार तालुक्यातील बोरखेडी प्रकल्पावर एक, खडकपूर्णा प्रकल्पातंर्गत एक, मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्प व चिखली तालुक्यातील पेनटाकाळी प्रकल्पावरून अवैधरित्या पाण्याची उचल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकी दोन तथा ब्राम्हणवाडा प्रकल्पावर एक अशा जवळपास आठ प्रकरणात कारवाई केली होती. सोबतच केबल वायर, २५० स्टार्टस आणि मोटार जप्त केल्या होत्या. मधल्या काळात ही कारवाई थंडावली होती. मात्र आता यंत्रणा पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसत आहे. परिणामी कोराडी, पेनटाकळीवरीलहा प्रकार बंद झाल्याचे सुत्रांनी सांगितले.खडकपूर्णावर अद्यापही १०० पंपविदर्भ-मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाच्या बॅक वॉटरमधून जालना जिल्ह्यात अद्यापही जवळपास १०० पेक्षा अधिक पंपाद्वारे पाण्याची अवैधरित्या उचल केल्या जात असल्याची ओरड आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी जालना जिल्हा प्रशासनास कल्पना दिल्यानंतरही प्रकरणी कारवाई होत नसल्याचे पाटबंधारे विभागातील सुत्रांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून मृत जलसाठ्यात असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात अवघा ८.९५ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पाची मृतसाठ्याची क्षमता ही जवळपास ६० दलघमी आहे. यावरून पाणीप्रश्नाच्या बिकटतेची कल्पना यावी.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर