शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मोताळा तालुक्यातील राजूर येथे बेकायदेशीर गर्भपात; दोन गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:26 IST

मोताळा : परराज्यात गर्भलिंग निदान करून मोताळा तालुक्यातील राजूर येथे अर्हता नसलेल्या एका डॉक्टरकडून महिलेचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणात बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दोन आरोपींना अटक केली आहे.

ठळक मुद्देसात दिवसांची पोलीस कोठडी : परराज्यात ‘कनेक्शन’!

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : परराज्यात गर्भलिंग निदान करून मोताळा तालुक्यातील राजूर येथे अर्हता नसलेल्या एका डॉक्टरकडून महिलेचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणात बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दोन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, न्यायालयाने दोन्ही आरोपींची २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.वैद्यकीय अर्हता नसलेल्या ब्रिजलाल सुपडा चव्हाण (५0, रा. गुळभेली) आणि डॉ. सय्यद आबिद हुसैन सय्यद नजीर (४९, रा. बुलडाणा) या दोन आरोपींना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोताळा तालुक्यातील एका महिलेचे परराज्यात गर्भलिंग निदान करण्यात आले होते.  त्यानंतर संबंधित महिलेच्या कुटुंबियांनी तिच्या गर्भपातासाठी मोताळा तालुक्यातील ब्रिजलाल सुपडा चव्हाण याच्याशी संपर्क केला होता. राजूर येथे संबंधित महिलेचा बेकायदेशीर गर्भपात त्याने केला; मात्र महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला बुलडाणा येथील डॉ. सय्यद आबिद हुसैन याच्याकडे नेण्यात आले. तेथे त्याने महिलेवर उपचाराचा प्रयत्न केला; परंतु महिलेची प्रकृती नाजूक झाल्याने  तिला अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.  तेथील रुग्णालयातील वैद्यकीय चमूने या प्रकरणाची माहिती बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयास दिली. सोबतच गंभीर महिलेवर यशस्वी उपचारही केले. या प्रकरणात मोताळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नाफडे यांच्या तक्रारीवरून १७ डिसेंबर रोजी बोलाखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  त्यानंतर पोलीस निरीक्षक अविनाश भामरे  यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनोने, नरेश रेड्डी यांनी बुलडाणा पोलिसांच्या मदतीने  मंगळवारी डॉ. सय्यद आबिद हुसेन यास बुलडाण्यातून अटक केली. दरम्यान, दुसरा आरोपी अन्य एका बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात धामगाव बढे पोलिसांच्या कोठडीत होता. त्याचीही पोलीस कोठडी २0 डिसेंबरला संपल्यानंतर त्यास बोराखेडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने २६ डिसेंबरपर्र्यंत  पोलीस कोठडी सुनावली आहे.   

टॅग्स :buldhanaबुलडाणाAbortionगर्भपातdoctorडॉक्टरArrestअटक