निवडीनंतर कागदपत्रे
३१ डिसेंबर ही नोंदणी करण्याची अखेरची मुदत असून त्यानंतर योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना आधारकार्ड, सातबारा, आठ अ, खरेदी करावयाच्या कृषी अवजाराचे कोटेशन, मान्यताप्राप्त तपासणी संस्थेचा तपासणी अहवाल, जातीचा दाखला, स्वयंघोषणापत्र, पूर्व संमतीपत्र आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
या याेजनांसाठी करता येइल अर्ज
एकाच क्लिकवर महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मुख्यमंत्री कृषी शाश्वत कृषी सिंचन याेजना, अन्न सुरक्षा अभियान, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना आदींची माहिती मिळत असून त्या योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्याचे आवाहन
एकाच क्लिकवर अनेक याेजनांचा लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.