शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

ताप न आल्यास विश्वास बसेना; लस खरी की खोटी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:41 IST

सद्य:स्थितीत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी दिल्या जात आहेत. ज्यांनी कोविशिल्ड घेतली, बहुतांश लोकांना लसीकरणानंतर ताप येणे, हातपाय ...

सद्य:स्थितीत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी दिल्या जात आहेत. ज्यांनी कोविशिल्ड घेतली, बहुतांश लोकांना लसीकरणानंतर ताप येणे, हातपाय दुखणे यासारखी लक्षणे दिसून आली. तुलनेने काेव्हॅक्सिन घेणाऱ्यांना कमी त्रास झाल्याचे दिसून आले. त्यामुळे ताप न आल्यास घेतलेली लस परिणामकारक आहे की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम हा निराधार असून, दोन्ही लसी परिणामकारक असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांचे आहे. जिल्ह्यात दिल्या जाणाऱ्या दोन्ही लसी परिणामकारक असून, पूर्णत: सुरक्षितदेखील आहेत.

त्यामुळे नागरिकांनी वेळेतच लसीचे दोन्ही डोस घ्यावे, असे आवाहनदेखील आरोग्य विभागामार्फत केले जात आहे.

कोविशिल्डचा त्रास अधिक

जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी नागरिकांना दिल्या जात आहेत. ज्यांनी कोविशिल्ड लस घेतली, त्यांना कोव्हॅक्सिनच्या तुलनेत जास्त त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. कोविशिल्ड लस घेतल्यानंतर बहुतांश लोकांना ताप येऊन गेल्याचे दिसून आले. या तुलनेत कोव्हॅक्सिन घेणाऱ्या क्वचितच लोकांना त्रास झाल्याचे दिसून आले.

लसीनंतर काहीच झाले नाही....

मी कोविड शिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र मला दसऱ्या डोसला कुठलाच त्रास झाला नाही. लस घेतल्यानंतर ताप येईल, अंगदुखीचा त्रास होईल, अशी भीती लस घेण्यापूर्वी होती. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. लसीकरण पूर्णत: सुरक्षित आहे. मी लस घेतली, तुम्हीही घ्या.

- भक्ती कदम, महिला.

माझे लसीकरण झाले आहे. लस घेतल्यानंतर कुठलाही त्रास झाला नाही. थोडी कणकण जाणवली, मात्र काही तासांतच बरे वाटायला लागले. त्यामुळे लसीकरणाविषयीची मनातील भीती नाहीशी झाली. तुम्हीदेखील लस घेऊन कोरोनापासून स्वत:चे रक्षण करा.

- ज्ञानेश्वर देशमुख, नागरिक

त्रास झाला तरच परिणामकारक असे अजिबात नाही

प्रत्येकाच्या शरीराची परिणामकारकता वेगवेगळी असते. त्यामुळे लस घेतल्यानंतर कोणाला ताप येऊ शकतो, तर कोणाला नाही. याचा अर्थ लसीकरणानंतर त्रास झाला तरच लस परिणामकारक आहे, असे अजिबात नाही. दोन्ही लसी परिणामकारक असून, सुरक्षित आहेत. त्यामुळे नागरिकांनी संभ्रमात न राहता मिळेल ती लस घेऊन कोविडपासून स्वत:चे व आपल्या कुटुंबीयांचे रक्षण करावे.

-डॉ. प्रशांत पाटील, वैद्यकीय अधिकारी, आरटीपीसीआर लॅब

आतापर्यंत झालेले लसीकरण

पहिला डोस - ८०११७८

दोन्ही डोस ११०७०९१

कोव्हॅक्सीन - २७९३७५

कोविशिल्ड - ८२७७१६