शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

गाव समृद्ध झाले तर लोकांना विस्थापित होण्याची गरज पडणार नाही - सत्यजित भटकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 17:33 IST

Satyajit Bhatkal News 'पाणी फाउंडेशन'चे सीईओ तथा  अभिनेता आमीर खानचे वर्गमित्र सत्यजित भटकळ यांच्याशी साधलेला संवाद.

- नवीन मोदे

 मोताळा : 'पाणी फाउंडेशन'चे सीईओ तथा सत्यमेव जयते या टीव्ही मालीकेचे दिग्दर्शक, अभिनेता आमीर खानचे वर्गमित्र, अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले सत्यजित भटकळ हे नुकतेच मोताळा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते.  त्यावेळी त्यांच्याशी साधलेला हा संवाद  सत्यमेव जयते ते वॉटर फाउंडेशन हा प्रवास कसा झाला ?सत्यमेव जयते हा कार्यक्रम सामाजिक प्रश्न वर आधारित होता. त्या वेळी देशातील विविध भागातील समस्या तसेच त्यासाठी अहोरात्र काम करणारे अनेक लोक भेटली. हि लोक त्या त्या ठिकाणी काम करत होती. त्यावेळी एखादा प्रश्न लावून धरून त्याचे जनआंदोलनात रूपांतर करून ती समस्या सोडवण्याचा आमिर खान यांनी विचार मांडला व त्यातूनच पाणी फाउंडेशन ची पुढची वाटचाल सुरु झाली.

 पाणी फाउंडेशन च्या आजपर्यंतची वाटचाल किती यशस्वी झाली असे तुम्हाला वाटते? लोक एकत्रित येऊन काम करू शकतात हे यातून सिद्ध झाले ही फक्त सुरुवात आहे. अजून खूप मोठा लढा बाकी आहे. जनआंदोलनातून गावे समृद्ध होऊ शकतात हा आत्मविश्वास मिळाला. 

समृद्ध गाव स्पर्धेचे नेमकी संकल्पना काय आहे ?

जलव्यवस्थापन जल व मृदसंधारण, गावकर्‍यांचे उत्पन्न वाढविणे ,जंगल निर्मिती ,मातीचे आरोग्य सुधारणे व गवताचे संरक्षित कुरान निर्माण करणे या प्रश्नावर काम केल्याशिवाय गावात समृद्धी येणार नाही, नेमके यावरच समृद्ध गाव स्पर्धेमध्ये काम होणार आहे .

जलयुक्त शिवार योजना बंद करण्यात आली आहे त्याचा काही परिणाम  होणार आहे का ?

जलयुक्त शिवार योजना अतिशय चांगली योजना होती जलसंधारणासाठी ती उपयोगी पडली. परंतु आजही अनेक योजना आहेत. त्यातूनही अनेक चांगली कामे होऊ शकतात यात शंका नाही.

 पाणी फाउंडेशन च्या कामाला सर्वांचे सहकार्य मिळाले का?

 नक्कीच सर्वच राजकीय पक्ष सामाजिक संस्था यांनी सहकार्य केले. अनेकांचे पाठबळ मिळाले शासन-प्रशासन खंबीरपणे पाठीशी उभी राहिले. शेवटी हे जन आंदोलन आहे .

पाणी फाउंडेशन च्या आज पर्यंतच्या वाटचालीबाबत आपण समाधानी आहात का ?

समाधानी आहे असे म्हटले तर चळवळ संपून जाईल .परंतु योग्यरीतीने वाटचाल सुरू आहे. एवढेच मी सांगू शकतो. मी तर म्हणेल फक्त ही एक सुरुवात आहे. पाणी फाउंडेशन सारख्या अनेक उपक्रमाची महाराष्ट्राला गरज आहे. स्वप्नातला गाव निर्माण व्हावीत, जगातून लोक ती पहायला यावे एवढा  बदल घडवण्याची कुवत गावातील लोकात आहे हे निश्चित.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा