शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्याच्या लॅबला 'आयसीएमआर'ची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 11:42 IST

तपासणीचे तांत्रिक कौशल्य बुलडाणा लॅबने अवगत केल्याने बुलडाणा लॅब कार्यान्वीत होण्याचा मार्ग आता मोकळा झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अडीच महिन्यापासून बुलडाण्यातील आरटीपीसीआर लॅब कार्यान्वीत होण्याची प्रतीक्षा आता संपली असून आयसीएमआरनेही परीक्षणानंतर बुलडाण्याच्या लॅबला मान्यता दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, नागपूर येथील दोन कोरोना संदिग्धांच्या नमुन्यांची तपासणीही बुलडाण्याच्या लॅबमध्ये करण्यात आली आहे.या तपासणीनंतर कोरोना संदर्भातील अहवाल तपासणीचे तांत्रिक कौशल्य बुलडाणा लॅबने अवगत केल्याने बुलडाणा लॅब कार्यान्वीत होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून त्यावर एक प्रकारे शिक्का मोर्तब झाले आहे. प्रारंभी बुलडाण्याच्या लॅबमध्ये अवघे ८० नमुने तपासल्या जातील. जसजसा लॅबचा आवाका वाढत झाली तसतशी ही क्षमता वाढविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १०० ते १५० नमुने तपासण्यात येणार आहे. नंतर एकाच वेळी जवळपास ९६ नमुने तपासण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली यंत्रसामुग्री उपलब्ध झाल्यानंतर बुलडाण्याची लॅब पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत होईल, असे सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. दुसरीकडे बुलडाण्याच्या लॅबमध्ये कोरोना नमुन्यांच्या तपासणीसाठी जवळपास दीड कोटी रुपयांचे रसायन लागण्याची शक्यता असून त्याची पुर्तता झाल्यानंतर बुलडाण्याची लॅब प्रत्यक्षात कार्यान्वीत होईल. ते झाल्यानंतर प्रसंगी अधिकृतस्तरावर बुलडाण्याची लॅब कार्यान्वीत झाल्याची घोषणा केली जाईल, असे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या