शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; पत्नीसह प्रियकराला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 12:48 IST

संगिताचे आतेभाऊ सुनिल दुंडियार (मु. पो. पिंपळगाव लेंडी ता. सिंदखेड राजा, ह. मु. औरंगाबाद ) याच्यासोबत अनैतिक संबंध होते.

बुलडाणा : पतीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने पत्नी व तिच्या प्रियकराला शुक्रवारी जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. संगीता संजय देव्हरे व सुनील दुंडियार अशी आरोपींची नावे आहेत.चिखली येथील संभाजी नगरमध्ये संजय शंकर देव्हरे (वय २९) पत्नी संगितासोबत भाड्याने खोली करुन राहत होते. संगिताचे आतेभाऊ सुनिल दुंडियार (मु. पो. पिंपळगाव लेंडी ता. सिंदखेड राजा, ह. मु. औरंगाबाद ) याच्यासोबत अनैतिक संबंध होते. दरम्यान १६ जानेवारी २०१८ रोजी सुनिल दुंडियार प्रियसीच्या भेटीसाठी चिखली येथे आला होता. त्याने संजय देव्हरे याला झोपेच्या गोळ्या टाकून मद्य पाजले. त्यानंतर रात्री १०.३० वाजताच्या सुमारास संगिताच्या मदतीने दोरीने गळा आवळून खून केला. दुसऱ्या दिवशी सकाळी संगिताने सासरे शंकर देव्हरे यांना फोन करुन पती हातपाय खोरत असल्याचे सांगितले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता संजय फरशीवर पडलेला दिसला.चिखली पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. कुटूंबियांना याप्रकरणाचा संशय आल्याने त्यांनी संगिताला विश्वासात घेवून विचारणा केली असता तिने खरी हकीकत त्यांना सांगितली. त्यानुसार मृताचे वडील शंकर देव्हरे यांनी १७ जानेवारी २०१८ रोजी चिखली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुनील दुंडियार व संगिता देव्हरे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. तपास अधिकाऱ्यांनी तपास करुन जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर सरकारी पक्षातर्फे १३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. फिर्यादी शंकर देव्हरे, मृताचा आई मंगला देव्हरे, काका सुरेश देव्हरे, रामेश्वर देव्हरे, घटनास्थळावरील पंच, वैद्यकिय अधिकारी, खोली मालक किरण मोरे, शुभम जाधव, व्हिडीओग्राफर बेलोकार, नोडल आॅफिसर व तपास अधिकारी सुधाकर गवारगुरु यांची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. महाजन यांनी दोन्ही आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल वसंत भटकर यांनी भक्कमपणे बाजू मांडली. पोलिस निरीक्षक गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनात कौर्ट पैरवी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पवार यांनी काम पाहिले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाLife Imprisonmentजन्मठेप