शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

शेकडो महिलांचा पाण्यासाठी आक्रोश; सुबोध सावजींच्या उपोषण मंडपाला भेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:57 IST

बुलडाणा : मेहकर तालुक्यातील द्रुगबोरी या आदिवासी गावातील तसेच शेगाव संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वाण, टुनकी, सोनाळा, वरखेड येथील शेकडो महिलांनी १७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या सुबोध सावजी यांच्या उपोषणाला भेट देऊन ‘पाणी द्या हो’ चा टाहो फोडत प्रशासनाप्रती आपला तीव्र संताप व्यक्त केला. 

ठळक मुद्देसुबोध सावजींच्या उपोषणाचा सातवा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मेहकर तालुक्यातील द्रुगबोरी या आदिवासी गावातील तसेच शेगाव संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वाण, टुनकी, सोनाळा, वरखेड येथील शेकडो महिलांनी १७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या सुबोध सावजी यांच्या उपोषणाला भेट देऊन ‘पाणी द्या हो’ चा टाहो फोडत प्रशासनाप्रती आपला तीव्र संताप व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बुलडाणा जिल्हा शासकीय नळ योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या उपोषण मंडपात दाखल झालेल्या शेकडो महिलांनी प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त केला. या उपोषणाचा आज सातवा दिवस होता. मंगळवारी सकाळी दहा वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. मारोडकर चमूसह उपोषण मंडपात दाखल झाले. उपोषणकर्ते सुबोध सावजी यांचे वजन करण्यासाठी आलेली वजन मोजण्याची ताण काट्याची जुनी मशीनवर त्यांचे वजन  केले असता वजन चुकीचे दर्शवित असल्याचे लक्षात आले. तेव्हा नवीन अँटोमॅटिक सेलवर चालणारी मशीन स्वत: मंडपात ठेवून वजन करण्यात आले, तर सुबोध सावजी यांचे वजन ९७ किलो ३00 ग्रॅम भरले. सुरुवातीला सरकारी मशीनवर वजन केले असता, त्यांचे वजन १४ किलो जास्त भरले. ही मशीन वजन मोजणारी की वजन वाढविणारी, असा प्रश्न  उपस्थिताना पडला. दुसर्‍या फेरीत आरोग्य तपासणीसाठी  दुपारी साडे अकरा वाजता आलेल्या प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मकानदार, निवासी आरोग्य अधिकारी डॉ. राठोड चमूने भेट दिली असता, माणसाचे वजन मोजणारी मशीन सरकारी यंत्रणेप्रमाणे बोगस असल्याचे सुबोध सावजी यांनी लक्षात आणून दिले, तरीसुद्धा अधिकार्‍यांनी नवीन मशीन उपलब्ध करून दिली नाही, त्यामुळे उपोषणकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून अधिकार्‍यांचा निषेध केला. दुपारी शेकडो महिला उपोषण मंडपात दाखल झाल्या. महिलांनी हातात माईक घेऊन ‘पाणी द्या हो.’ चा टाहो फोडला. द्रृगबोरीच्या नर्मदाबाई वायसे, रूखमाबाई गायकवाड, ताराबाई शिंदे, सुशिलबाई इंगळे यांनी दररोज एक टँकर गावात येते असे सांगितले. परंतू अध्र्या गावाला पाणीच मिळत नाही. नळ योजना कागदोपत्रीच मंजूर झाली. दहा कि. मी. वरून रात्रभर पाणी भरावे लागते अशा प्रशासकीय अधिकार्‍यांच्या विरोधात  भावना व्यक्त केल्या.उपोषण मंडपाला आमदार राहुल बोंद्रे, गंगाधर जाधव, सायली सावजी, जयश्री शेळके, नंदा पाऊलझगडे, दीपक देशमाने, समाधान सुपेकर, डॉ. झाडोकार, विनोद देशमुख, मधुकर गवई, मोहन जाधव, अँड. राजेश गवळी, प्रभाकर पवार, मनोहर बोराखडे, गोपाल वानेरे, वामनराव देशमुख, मुन्ना ठेकेदार, आशिष जाधव, ताराबाई शिंदे, सुशिला इंगळे, मंगला वानेरे, बशीरबाई शे. करीम, नंदाबाई गिर्‍हे, सुधाकर ढोणे, नर्मदा वायसे  यांनी भेटी दिल्या.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSubodh Savjiसुबोध सावजी