अमडापूर (जि. बुलडाणा) : बँकेत पैशाचा भरणा करण्यासाठी जात असलेल्या व्यक्तीच्या दुचाकीचा पाठलाग करून त्याच्या जवळील दीड लाख रुपये लुटणार्या आरोपीस अमडापूर पोलिसांनी गजाआड केले. सदर आरोपीचे नाव शे. शकील शे.इसा असून, तो बुलडाणानजीक भादोला गावचा आहे. त्याला सैलानी यात्रेतून पोलिसांनी बेड्या घातल्या. शांती सवरे स्टेशनवर नोकरी करणार्या कर्मचार्यांने २१ मार्च रोजी बँकेत पैशाचा भरणा करण्यासाठी थैलीत ५ लाख रुपये घेऊन अमडापूरला येत होता. दहीगाव-करणखेड रस्त्यावर चोरट्याने त्याच्या वाहनाचा पाठलाग करून त्याचे वाहन रस्त्यावर पाडून दीड लाख रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला होता. दरम्यान, झालेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमडापूरचे ठाणेदार निशांत मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक सैयद मोहसीन, पोलीस निरीक्षक लक्ष्मण मिरगे, पोहेकॉ ठाकरे, सुधाकर काळे यांच्यासह कर्मचार्यांनी आरोपी शे. शेकील शे.इसा यास सैलानी यात्रेतून जेरबंद केले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
दीड लाख रूपये लुटणा-यास अटक
By admin | Updated: March 26, 2016 02:15 IST