शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शेकडो मुलांनी दिले माफीनामे!

By admin | Updated: September 24, 2016 02:30 IST

गत दोन वर्षात छेडखानी प्रकरणात जिल्ह्यात शेकडो मुलांनाही माफीनामे लिहून दिले आहे.

नीलेश शहाकार बुलडाणा, दि. २३ - छेडखानी प्रकरणात मुलींना कायद्याचे संरक्षण आहे, शिवाय प्रकरण गंभीर नसताना केलेल्या कृत्याचा पश्‍चात्ताप व्यक्त करण्यासाठी कारवाई पथकामार्फत दोषी मुलांकडून बर्‍यावेळा माफीनामे घेतले जातात. गत दोन वर्षात जिल्ह्यात शेकडो मुलांनाही माफीनामे लिहून दिले असून, यापुढे असे कृत्य हातून घडल्यास कायदेशीर कारवाईस पुढे जाण्याची तयारी दर्शविली आहे.शहरातील सार्वजनिक ठिकाण, शाळा, महाविद्यालय, रेल्वेस्टेशन व बसस्थानक आदी ठिकाणी बर्‍याच वेळा मुलींना छेडखानीसारख्या घटनांना तोंड द्यावे लागते. अशा छेडखानी करणार्‍यांवर वचक बसविण्यासाठी तसेच मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे दक्षता व दामिनी पथक कार्यरत आहे. त्यामुळे पथकांकडून रोजच लहान-मोठय़ा कारवाया केल्या जातात.मुलींची छेडखानी करताना आढळलेल्या मुलांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे; मात्र प्रकरण फारसे गंभीर नसेल, शिवाय कार्यवाहीने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असेल, अशावेळी माफीनामे लिहून घेत, त्यांच्यावरील कारवाई तूर्तास टळली जाते. यानंतर मात्र सदर युवक पुन्हा छेडखानी करताना आढळला तर गुन्हे दाखल करण्यात येतात. १५९ मुलांना झाला पश्‍चात्तापकारवाई दरम्यान मुलामुलींच्या नावामध्ये कमालीची गुप्तता बाळगली जाते. शिवाय मुलींच्या सुरक्षेसोबतच मुलाच्या सामाजिक व शैक्षणिक आयुष्याकडेही सकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. यातून संधी देत दोन वर्षात १५९ मुलांनी केलेल्या कृत्याचा पश्‍चात्ताप व्यक्त करीत आपले माफीनामे पोलीस व दक्षता पथकाकडे दिले. असे कृत्य भविष्यात घडल्यास कायदेशीर कारवाईस पुढे जाण्याची तयारी दर्शविली आहे.गंभीर प्रकरण पोलिसांकडेमुलींना घरुन पळवून नेणे, मारहाण, लैंगिक व शारीरिक अत्याचार, अश्लील व्हिडिओ, मॅसेज आदी गंभीर प्रकरण पथकाच्या कारवाईत आढळून आल्यास, यात माफीनाम्याची तरतूद नाही, मग अशी प्रकरणे वरिष्ठास सोपवून त्यात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येते. दोन वर्षात तब्बल दोनशेच्यावर असे गुन्हे दाखल झाले आहेत.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत ही कारवाई केली जाते. चुका सौम्य असल्यास आयुष्यात सुधारण्याची पुन्हा एक संधी देण्यासाठी माफीनामा लिहून घेतला जातो. पुन्हा चूक झाल्यास तो कायदेशीर कारवाईस पात्र ठरतो.- प्रभाकर वाघमारे, पोलीस दक्षता पथक प्रमुख