शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी अतिरिक्त सेविकेसाठी शेकडो अर्ज

By admin | Updated: August 29, 2014 00:06 IST

मातोळा व खामगाव तालुक्यातील अतिरिक्त अंगणवाडी सेविके च्या पदासांठी शेकडो अर्ज दाखल झालेत.

मोताळा/खामगाव : मातोळा व खामगाव तालुक्यातील अतिरिक्त अंगणवाडी सेविके च्या पदासांठी शेकडो अर्ज दाखल झालेत. मातोळा तालुक्यातील १0५ गावांधील २२0 अंगणवाडी अतिरिक्त सेविकेसाठी जवळपास एक हजार अर्ज दाखल करण्यात आले.योजना पुनर्रचना व बळकटीकरण अतंर्गत कार्यरतअंगणवाडी केंद्रासाठी अतिरिक्त सेविका अर्थात दुसरी कार्यकर्ता मानधन तत्वावर नियुक्त करण्याचा निर्णय राज्याच्या महिला व बालविकास आयुक्तालयाने घेतल्या नंतर तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये अतिरिक्त सेविकांची अर्ज दाखल करण्यासाठी २८ ऑगस्ट ही अंतिम मुदत होती. या योजनेसाठी राज्यातील २0 जिल्हय़ांची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली. त्यात बुलडाणा जिल्हय़ाचा समावेश असल्याने त्याअंतर्गत एकात्मीक बालविकास सेवा योजना कार्यालय पं.स.मोताळा यांनी तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्राकरीता स्थानिक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज करण्याची गुरूवारी अंतिम मुदत होती. त्यामुळे महिलांनी तालुका कार्यालयात मोठी गर्दी केली होती. तालुक्यातील २२0 जागांसाठी १0५ गावांमधील ९८५ महिलांनी आज शेवटच्या दिवसापर्यंत एकात्मीक बालविकास प्रकल्प अधिकार्‍याकडे अर्ज केले आहे. अतिरिक्त सेविका ही मानधन तत्वावर कें द्रशासनाकडून देय असलेल्या अनुदानावर तात्पुरत्या स्वरूपात नेमली जाणार आहे. त्यांची निवड कोणत्याही निवड समितीकडून केली जाणार नाही.केवळ पात्रतेच्या अटीनुसार गुणवत्ता व इतर नैसर्गिक गुणांच्या आधारे निवड केली जाणार आहे. या पदासाठी किमान १0 वी पासची अट ठेवण्यात आली आहे. तसेच स्थानिक रहिवासी असावी, २१ ते ३0 वर्ष वयोगटातील आणि दोन जिवंत अपत्यांपेक्षा जास्त अपत्य नसली पाहिजेत असेही स्प्ष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत खामगाव तालुक्यात भरल्या जाणार्‍या अंगणवाडी सेविकांच्या २४0 जागांसाठी आज २८ ऑगस्ट या शेवटच्या दिवशीपर्यंत अंदाजे १४00 जणांनी अर्ज दाखल केले आहे. आज शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी होवून सुमारे ८00 महिला व युवतींनी अर्ज केले. महिला व बाल विकास प्रकल्प अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर १, मेहकर २, मोताळा, मलकापूर, नांदुरा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात एकूण २५७७ अंगणवाडींवर अतिरिक्त अंगणवाडी सेविका (दुसरी कार्यकर्ती) नियुक्ती करण्यात येत आहे. यामध्ये खामगाव तालुक्यात २४0 अतिरिक्त अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी २२ ते २८ ऑगस्ट दरम्यान अर्ज मागविण्यात आले होते. आज अर्ज करण्याची शेवटची दिनांक असल्याने महिलांची एकच गर्दी झाली होती. यामुळे रात्री उशीरापर्यंत हजर असणार्‍यांचे अर्ज स्विकारण्यात आले, अशी माहिती खामगाव पं.स.चे गटविकास अधिकारी प्रकाश वाघ यांनी दिली.