शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

हे कसे घडले....स्वॅब दिला नाही, तरीही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 11:14 IST

CoronaVirus Test रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार मोताळा येथील सहकार विद्या मंदिरातील कोविड केअर सेंटरमध्ये उघडकीस आला आहे.

स्वॅब न देताच एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्हलोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : कोरोना चाचणीसाठी स्वॅब दिलेला नसतानाही एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार येथील सहकार विद्या मंदिरातील कोविड केअर सेंटरमध्ये उघडकीस आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाने कळस गाठल्याची अेारड होत आहे.प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मोताळा येथील पंडितराव कैलासराव देशमुख यांना  त्यांना खोकला आल्यामुळे २५ फेब्रुवारी रोजी सकाळी तपासणीसाठी मोताळा येथील कोविड केअर सेंटर गाठले होते. या ठिकाणी त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांकाची नोंद घेण्यात आली. मात्र त्यांना स्वॅब देण्यासाठी दुपारी बोलावण्यात आले होते. परंतु पंडितराव देशमुख पुन्हा कोरोना केंद्रात गेलेच नाहीत. दरम्यान, आठवडाभरानंतर शुक्रवार ५ मार्च रोजी कोविड केअर सेंटरमधील कर्मचाऱ्याने पंडितराव देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला व त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले.  त्यामुळे देशमुख यांना धक्काच बसला. या प्रकरणी देशमुख यांनी आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणावर बोट ठेवत संताप व्यक्त केला आहे.या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती घेतली असता देशमुख यांनी नोंदणी केल्यावर स्वॅब घेण्यासाठी त्यांच्या नावाचा ट्यूब तयार करण्यात आला होता.  त्यात दुसऱ्याच व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आरोग्य विभाग पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहे. जिल्हाभरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना,  घडलेल्या या प्रकाराची गंभीरतेने दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी होत आहे. आता या प्रश्नी आरोग्य विभाग काय कारवाई करतो याकडे सध्या लक्ष लागून आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई करण्यात येईल. ज्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्याचा सध्या शोध घेण्यात येत आहे.-डॉ. रवींद्र पुरी, तालुका आरोग्य अधिकारी, मोताळा

मला खोकला असल्याने स्वॅब तपासणीसाठी गेलो होतो. त्यांनी नोंदणी करून दुपारी येण्यास सांगितले. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव स्वॅब देण्यास पुन्हा जाता आले नाही. तरीसुद्धा माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा फोन आला. सदर प्रकार हलगर्जीपणाचा कळस गाठणारा आहे. - पंडितराव देशमुख, रा. मोताळा.

टॅग्स :Motalaमोताळाcorona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा