शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

घरकुल योजनेला कोरोनाची बाधा; २९०० लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 16:58 IST

समाज कल्याण विभागाच्या योजनाही निधीअभावी रखडल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: बेघर तसेच दारिद्र रेषेखालील लाभार्थ्यांना घर देण्याच्या उदात्त हेतून सुरू केलेल्या रमाई घरकुल योजनेला कोरोनाची बाधा झाल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी २ हजार ९०० लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली होती. मात्र या लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला टप्पाही मिळाला नाही. त्यामुळे घरकुलांची कामे रखडली आहेत. शहरातील घरकुलांची हीच स्थिती आहे.तसेच समाज कल्याण विभागाच्या योजनाही निधीअभावी रखडल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.दारिद्र रेषेखालील लोकांना हक्काचे घर मिळावे, या उदात्त हेतुने शासनाने रमाई घरकुल योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गंत जिल्ह्यात २०१९-२० मध्ये २९०० घरकुले बांधण्याचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले होते. यापैकी २हजार ६६७ घरकुलांचे जिओ टॅग करण्यात आले. त्यापैकी दोन हजार ४४६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. तसेच दोन हजार २३१ लाभार्थ्यांचे बँक खातेही प्रमाणीत करण्यात आले होते. मात्र, मार्च महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाच्या विविध योजना गुंडाळण्यात आल्या आहेत. रमाई घरकुल योजनेसाठीही शासनाकडे निधी नसल्याने २हजार ९०० लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक घरकुले जळगाव जामोद तालुक्यात ५००, त्यानंतर शेगाव ३००, बुलडाणा २००, चिखली ३००, देउळगाव राजा २५०, खामगाव १००, लोणार २००, मलकापूर २००, मेहकर २००, मोताळा १००, नांदुरा २५०, संग्रामपूर १५० तर सिंदखेड राजा १५० घरकुलांचे लक्ष्य होते. या लक्ष्यांकापैकी एकही घरकुल पूर्ण झालेले नाही. नगर पालिका क्षेत्रात समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून रमाई घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो. गेल्या वर्षीचे ५३१ लाभार्थ्यांना निधी अभावी अनुदान मिळाले नसल्याचे चित्र आहे. तसेच समाज कल्याण विभागाच्या अनेक योजनांनाही कोरोनाचा फटका बसला आहे.

लाभार्थ्यांना फरकाची रक्कमही मिळेणाघरकुल लाभार्थ्यांना पूर्वी १ लाख ५० हजार रुपये अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये शासनाने एक लाख रुपये वाढ केली आहे. शासनाच्या निर्णयानंतर ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहेत, अशा लाभार्थ्यांच्या फरकाची रक्कम मिळण्याठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. .जिल्ह्यातील २७७ लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. घरकुल बांधून पूर्ण होउनही फरकाची रक्कम मिळाली नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या