शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहातील मुलींना विषबाधाप्रकरणी गृहपाल निलंबित; पोलिसांतही गुन्हा दाखल

By संदीप वानखेडे | Updated: September 25, 2023 19:16 IST

श्वेता महालेंनी केली होती मागणी

चिखली : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे व आर्थिक मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहातील ६ मुलींना २२ सप्टेंबरच्या रात्री जेवणतून विषबाधा झाली होती. आ. श्वेता महाले यांनी याप्रकरणी संबंधित वसतिगृहाच्या अधीक्षकांवर कठोर कारवाईची मागणी राज्य शासनाकडे केली होती. यावरून समाजकल्याण विभागाने संबंधित वसतिगृह अधीक्षकांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश २५ सप्टेंबर रोजी दिले आहेत.

सहायक आयुक्त, समाज कल्याण, बुलढाणा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागास तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहातील ६ मुलींना २२ सप्टेंबर रोजी विषबाधा झाली होती. या घटनेबाबत विशेष तपासणी पथकामार्फत २३ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली असता, या शासकीय वसतिगृहाच्या ठिकाणी मुलींना देण्यात येणाऱ्या भोजनाची प्रत अत्यंत निकृष्ट असल्याचे तसेच इतर सोई-सुविधांच्या बाबतीत गंभीर उणिवा आढळून आल्या, तसेच अधिनस्त कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या कामावर नियंत्रणाचा अभाव असल्याचे अहवालावरून निदर्शनास आले आहे. त्यामुळे या शासकीय वसतिगृहाच्या प्रभारी गृहपाल एस. एस. जोशी, कनिष्ठ लिपिक यांनी शासकीय कर्तव्य पार पाडताना हलगर्जीपणा व कसूर केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक नियम १९७९) नियम क्रमांक ३ (१) (एक) (दोन) (तिन) मधील नियमाचा भंग केलेला असल्याने त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम क्रमांक ४ (१) (अ) या नियमांतर्गत कनिष्ठ लिपिक या पदाचे नियुक्ती प्राधिकारी व शिस्तभंग विषयक प्राधिकारी म्हणून प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग अमरावती यांनी कनिष्ठ लिपिक एस. एस. जोशी यांना शासकीय सेवेतून तत्काळ निलंबीत करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिसांत गंभीर गुन्हे दाखलयाप्रकरणी सीमा प्रकाश चव्हाण वय २३, रा. सावखेड नागरे, ता. देऊळगाव राजा हिने चिखली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार आरोपी वसतिगृहाच्या अधीक्षक स्मिता श्रीकांत जोशी वसतिगृहातील मुलींच्या जेवणात अळ्या व उंदरांच्या लेंड्या निघाल्यावरून मुलींना विषबाधा होऊ शकते हे माहीत असूनही जाणीवपूर्वक अन्न खायला दिले, तसेच जातीवाचक शिवीगाळ करून कोणाला काही सांगितल्यास प्रवेश रद्द करण्याची धमकी दिल्याचे नमूद केले आहे. या तक्रारीवरून आरोपी जोशींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.