शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव शहरातील हॉटेल व्यावसायिकांनाही पडला मास्कचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 12:33 IST

Khamgaon News खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरील विक्रेते मास्क आणि इतर नियमांना तिलांजली देत आहेत.

ठळक मुद्दे विक्रेते कुठेही मास्कचा वापर करताना दिसून येत नाहीत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरील विक्रेते मास्क आणि इतर नियमांना तिलांजली देत आहेत. त्यामुळे, नागरिकांनो सावधान! तुम्ही खाद्यपदार्थांसोबत कोरोना विषाणूही विकत तर घेत नाही ना, याची खातरजमा करून घ्या; अन्यथा तुम्ही व तुमच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, अशीच परिस्थिती सध्या शहरात दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात असला तरी त्याचे संपूर्णपणे उच्चाटन झालेले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन व इतर यंत्रणांकडून वारंवार मास्क व इतर नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली केली जात आहे; मात्र शहरातील चायनीज, वडापाव, भेळपुरी, अंडाभुर्जी, स्वीट कॉर्न भेळ, फिंगर व इतर पदार्थ विक्रेते कुठेही मास्कचा वापर करताना दिसून येत नाहीत. शासनाच्या नियमांनाच या विक्रेत्यांनी उघडपणे धाब्यावर बसविले असल्याचे चित्र आहे. शहरालगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर ढाबे आहेत. येथेही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. हॅणडवॉश स्टेशन उभारले नसून सॅनिटायझरही ठेवले जात नाही..

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या