शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयांना ‘जनआरोग्य’चे वावडे, १.३२ टक्का रुग्णांनाच मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:34 IST

जिल्ह्यात आजपर्यंत ७७ हजार ४४ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, त्यापैकी शासकीय व खासगी मिळून १,०१९ जणांवरच उपचार करण्यात आले ...

जिल्ह्यात आजपर्यंत ७७ हजार ४४ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, त्यापैकी शासकीय व खासगी मिळून १,०१९ जणांवरच उपचार करण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयामध्ये तर केवळ १२ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. उर्वरित सर्व १,००७ रुग्णांवर शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले आहेत. त्यावर २ कोटी ३ लाख ८० हजार रुपयांचा खर्च झालेला आहे.

सहा रुग्णालयांना नोटीस

कोरोनाबाधित रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचाराचा लाभ न दिल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने सहा खासगी रुग्णालयांना नोटीस दिल्या आहेत. त्यासंदर्भात अद्याप संबंधित रुग्णालयांकडून त्याचे स्पष्टीकरण दिले गेलेले नाही.

एकूण २० पॅकेज उपलब्ध

कोरोनाबाधित रुग्णांसाठी जनआरोग्य योजनेंतर्गत एकूण २० पॅकेज उपलब्ध आहेत. प्रामुख्याने फुप्फुसाशी संबंधित (श्वसनाशी संबंधित) आजाराच्या पॅकेजचा यामध्ये समावेश आहे. पॅकेजअंतर्गत दहा दिवसांनंतरही रुग्ण बरा न झाल्यास त्या पॅकेजला मुदतवाढ देण्याची सुविधा आहे. त्यासाठी एक दिवसाच्या अंतराने पॅकेजचे नूतनीकरण करता येते.

आपत्कालीन सुविधाही

रुग्णाची गंभीर अवस्था असल्यास आपत्कालीन स्थितीत केवळ सूचनाही देऊनही योजनेंतर्गत रुग्णाला लाभ दिला जाऊ शकतो. त्यासाठी इर्मजन्सी टेलिफोनिक इंटिमेशनची सुविधा आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत ती दिले जाते. खासगी रुग्णालयातून, लॅबमधून केलेल्या केविड चाचणीचा खर्चही योजनेतील पॅकेजमध्ये होत असल्यास व त्याची पूर्वपरवानगी मिळाल्यास कोविड चाचणीचाही खर्च पॅकेजमध्ये अंतर्भूत असतो.

३० जनआरोग्य मित्रांकडे करता येते नोंदणी

योजनेच्या लाभ देण्यासाठी जिल्ह्यात ३० जन आरोग्यमित्रांची मदत घेता येऊ शकते. प्रसंगी संबंधितांच्या व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र टाकल्यास योजनेमध्ये रुग्णाचा अंतर्भाव करण्यास हे आरोग्यमंत्री मदत करतात. दरम्यान, खासगी रुग्णालयांकडून काही अडचणी येत असल्यास योजनेचे जिल्हा समन्वयक आणि क्षेत्रीय व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार किंवा संपर्क साधता येतो. जिल्हाधिकाऱ्यांकडेही ई-मेलद्वारे तक्रार करता येते.