शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

फायर ऑडिटविनाच बुलडाणा शहरातील हॉस्पिटल सर्रास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 10:56 IST

Hospitals in Buldana open without fire audit : एक खासगी रुग्णालय वगळता कुठल्याही रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याचे चित्र आहे.

- भगवान वानखेडे लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : रूग्णालयात शॉटसर्कीट होऊन आग लागू नये म्हणून फायर ऑडिट करणे गरजेचे असते. असे जरी असले तरी मात्र, शहरातील एक खासगी रुग्णालय वगळता कुठल्याही रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याचे चित्र आहे. तेव्हा शहरातील कोणत्याही रुग्णालयात कधीही आणि कसाही अनुचित प्रकार घडून मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अग्निशमन विभागाने दिलेल्या नोटीसला शहरातील खासगी रुग्णालयांनी केराची टोपली दाखविली आहे हे विशेष.बुलडाणा शहर हे वैद्यकीयदृष्ट्या झपाट्याने वाढत जाणारे शहर आहे. मागील दशकभरापासून शहरात नवे-जुने असे एकूण ७८ खासगी रुग्णालय वैद्यकीय सेवा देत आहेत. मात्र, या सर्वच्या सर्व खासगी रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णालयात असणाऱ्या रुग्णांच्या जीवाशी हा खेळ सुरू असून, शॉटसर्कीट वा इतर काही कारणांनी रुग्णालयात आग लागल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे. असे जरी असले तरी मात्र, या रुग्णालयांचे संचालक या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत. तेव्हा मोठी दुर्घटना झाल्यावरच या रुग्णालयांच्या संचालकाना जाग येईल का असा सवाल यानिमित्ताने विचारल्या जात आहे. 

दोन वेळा बजावल्या आहेत नोटीसनगर पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांना फायर ऑडिट करून घेण्यासाठी दोन वेळा नोटीस बजावल्या आहेत. मात्र, दोन्ही वेळी नोटीसला रुग्णालयांच्या संचालकांनी केराची टोपली दाखविली आहे. आता पुन्हा तिसऱ्यांदा नोटीस बजावण्यात येणार असून, यावेळी न ऐकल्यास योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून मिळाली आहे. 

जिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव मंत्रालयात   येथील खासगी रुग्णालयाबरोबरच जिल्हा सामान्य रुग्णालयाचेही फायर ऑडिट झाले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. रुग्णालय प्रशासनाला नोटीस बजावल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने फायर ऑडिटसाठी लागणाऱ्या निधीसाठी वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव दाखल केल्याची माहिती आहे. तेव्हा या रुग्णालयाचे फायर  ऑडिट केंव्हा होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  तर जिल्हा स्त्री रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले असल्याची माहिती आहे. 

दोन वेळा बजावल्या आहेत नोटीसn नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांना फायर ऑडिट करून घेण्यासाठी दोन वेळा नोटीस बजावल्या आहेत. मात्र, दोन्ही वेळी नोटीसला रुग्णालयांच्या संचालकांनी केराची टोपली दाखविली आहे. आता पुन्हा तिसऱ्यांदा नोटीस बजावण्यात येणार असून, यावेळी न ऐकल्यास योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून मिळाली आहे. 

रुग्णालयांनी फायर ऑडिट करावे यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जाते. मात्र, दोन वेळा नोटीस बजावूनही रुग्णालय फायर ऑडिट करीत नसल्याचे चित्र आहे. मात्र, आता तिसऱ्यांदा नोटीस पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर फायर ऑडिट न झाल्यास कारवाई करण्यात येईल. -विनोद खरात, सहायक अग्निशमन अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाhospitalहॉस्पिटलfireआग