शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात आणखी एक टायगर कॉरिडॉर निर्माण होण्याचे आशादायक चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 15:16 IST

यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वाघ बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवरील जंगला आल्याची चर्चा आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वाघ थेट बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या घाटबोरीच्या जंगलात आल्याच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात आणखी एक ‘टायगर कॉरिडॉर’ निर्माण होण्याचे आशादायक चित्र आहे.घाटबोरीच्या जंगलात वाघ असल्याचे वृत्त व स्थानिक नागरिकांमधील घबराट पाहता वाईल्ड लाईफ आॅफ इंस्टीट्यूटच्या दोन पथकांची या भागात बारिक नजर असून घाटबोरीपर्यंत आलेला हा वाघ परतीच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शेड्यूल ए मधील प्राणी असल्याने त्याचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने काही बाबी गोपनियच ठेवणे गरजेचे असल्याचे वनविभागातील वरिष्ठ सुत्रांनी स्पष्ट केले.दुसरीकडे मेळघाटमधील वाघ अनेरडॅम अभयारण्यापर्यंत नेण्याचा प्रस्ताव व योजनाही गेल्या चार वर्षापासून संकल्पीत स्तरावर आहे. त्यातच फेब्रुवारी २०१९ च्या पहिल्या आठवड्यात मलकापूर तालुक्यातील दुधलगाव परिसरात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले होते. त्यावेळी परिसरात चार ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले होते. परिणामी जळगाव खान्देश जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि वढोदा वन परिसरात वाघ असल्याच्या बाबीस पुष्टी मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. आता यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वाघ बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवरील जंगला आल्याची चर्चा या भागात गुरांची त्याने केलेली शिकार पाहता त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत असून प्रसंगी एक मोठा कॉरिडॉर त्यादृष्टीने निर्माण करण्याची गरज आहे. आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या टायगर सेलच्या बैठकीत याबाबतच्या अनेक बाबी उहापोह होईल. नाही म्हणायला सा महिन्यातून किमान एकदा टायगर सेलची बैठक होणे क्रमप्राप्त आहे.

वाघ आता परतीच्या मार्गावर वाईल्ड लाईफ आॅफ इंडिया या भागातील स्थितीवर लक्ष ठेवून असून कथितस्तरावर आलेला हा वाघ आता परतीच्या मार्गावर असल्याचेही संकेत मिळत आहे. प्रसंगी हा वाघ बुलडाण्यालगतच्या ज्ञानगंगा अभयारण्यापर्यंत पोहोचल्यास अस्वलांसाठी प्रसिद्ध असलेल्या या १९९७-९८ मध्ये अभयारण्याचा दर्जा दिलेल्या या जंगलासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरले.वाघाच्या संरक्षणाच्या दृष्टीने वनविभागाकडून बाबी गोपनिय ठेवण्यात येत आहेत.