शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

होमगार्ड स्वयंसेवक देणार अन्यायाविरोधात लढा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:19 IST

शासानाच्या १३ जुलै २0१0 च्या निर्णयानुसार १२ वर्षांच्या सेवा कालावधीनंतर होमगार्डची सेवा समाप्त करण्यात आली होती; मात्र या शासन निर्णयास १0 जुलै २0१७ रोजी स्थगिती मिळाल्याने सेवेतून कमी झालेल्या होमगार्ड स्वयंसेवकांना पूर्ववत संघटनेत सामावून घेण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र या आदेशाची अवहेलना करीत होमगार्ड उपमहासमादेशक यांच्याकडून कारवाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोप जिल्हय़ातील होमगार्डनी केला असून, पूर्वीच्या स्वयंसेवकांना डावलून नवीन नोंदणी भरती प्रक्रियेस प्राधान्य दिल्या जात आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात जिल्हय़ातील होमगार्ड स्वयंसेवकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, ११ सप्टेंबरपासून बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहेत.

ठळक मुद्देशासन निर्णयानुसार संघटनेत पूर्ववत सामावून घेण्याची मागणीउपमहासमादेशक यांच्याकडून कारवाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शासानाच्या १३ जुलै २0१0 च्या निर्णयानुसार १२ वर्षांच्या सेवा कालावधीनंतर होमगार्डची सेवा समाप्त करण्यात आली होती; मात्र या शासन निर्णयास १0 जुलै २0१७ रोजी स्थगिती मिळाल्याने सेवेतून कमी झालेल्या होमगार्ड स्वयंसेवकांना पूर्ववत संघटनेत सामावून घेण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र या आदेशाची अवहेलना करीत होमगार्ड उपमहासमादेशक यांच्याकडून कारवाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोप जिल्हय़ातील होमगार्डनी केला असून, पूर्वीच्या स्वयंसेवकांना डावलून नवीन नोंदणी भरती प्रक्रियेस प्राधान्य दिल्या जात आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात जिल्हय़ातील होमगार्ड स्वयंसेवकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, ११ सप्टेंबरपासून बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहेत.राज्यात १२ वर्षांपासून सेवा देणार्‍या होमगार्ड सेवकांना २0१0 च्या निर्णयानुसार सेवेतून कमी करण्यात आले होते. यांतर्गत जिल्हय़ातील एकूण ६८ सेवकांवर सेवा समाप्तीची कारवाई झाली असून, यामध्ये चिखली तालुक्यातील १३ होमगार्ड सेवकांचा समावेश आहे. दरम्यान, या निर्णयास ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याने बारा वर्षांचा सेवाकाळ संपल्यानंतर घरी बसलेल्या अनेक होमगार्ड सेवकांना दिलासा मिळून ते सेवेत पूर्ववत सामील होणे आवश्यक होते; मात्र होमगार्ड राज्य उपमहासमादेशक यांच्याकडून अद्यापही  त्याबाबत कारवाई झालेली नसल्याने राज्यातील अनेक होमगार्ड सेवक पूर्ववत सेवेत सामील होण्याच्या आशेवर आहेत, तर उपमहासमादेशक यांच्याकडून सेवा समाप्त केलेल्या होमगार्ड स्वयंसेवकांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार होणे व त्याबाबत सर्व जिल्हा समादेशकांना आदेश देणे होमगार्ड सेवकांना अपेक्षित होते; मात्र उपमहासमादेशक यांनी तसे न करता नियमबाहय़रीत्या नवीन नोंदणी चालविली असल्याने सेवा समाप्तीची कारवाई झालेल्या होमगार्ड सेवकांवर अन्याय होत असल्याचा आरोप सेवा समाप्तीची कारवाई झालेल्या होमगार्ड सेवकांनी केला असून, ९ व २३ ऑक्टोबर २0१७ च्या शासन निर्णयानुसार सेवा समाप्तीची कारवाई झालेल्या होमगार्ड स्वयंसेवकांना पूर्ववत संघटनेत सामावून घेण्यात यावे व पटावरील रिक्त अनुशेष पूर्ण केल्यानंतरच नवीन नोंदणी भरतीचा विचार होण्यासाठी बुलडाणा जिल्हा होमगार्ड कार्यालयाने घेतलेल्या होमगार्ड सदस्य नोंदणीस तत्काळ स्थगिती मिळावी, आदी मागण्यांसाठी ११ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी बुलडाणा व जिल्हा समादेशक कार्यालयासमोर होमगार्ड माजी जिल्हा समादेशक प्रा.जगदेवराव बाहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमरण उपोषणास बसण्याचा इशारा आशा गवई, भगवान खरात, सुनील घट्टे, पंढरी जाधव, अशोक बाबर, अंबादास तायडे, गजानन वरपे, कौशल्या चौधरी, विजय शेळके,  अजय पाटील, अनिता राऊत, पांडुरंग सोनुने, रामदास शेळके, आर.एस. हिवाळे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)