शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

निकृष्ट टरबूज बियाण्यांची होळी

By admin | Updated: April 20, 2016 02:04 IST

संग्रामपूर येथे शेतक-यांनी फेकले रस्त्यावर टरबूज; युवक काँग्रेस व संभाजी ब्रिगेडांचा आंदोलनात सहभाग.

संग्रामपूर (जि. बुलडाणा): तालुक्यातील काथरगाव येथील शंभर शेतकर्‍यांनी नामधारी ७५0 या कंपनीचे टरबूज बियाण्यांची लागवड केली होती. हे बियाणे निकृष्ट निघाल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला, टरबूज फळ हे पूर्णपणे भरले नाही, तसेच त्याची वाढही झाली नाही या प्रकाराबाबत शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ही तक्रार केली; मात्र त्याची दखल न घेतल्याने अखेर मंगळवारी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसह शेतकर्‍यांनी सदर बियाण्यांच्या पाकिटाची होळी केली व टरबूज रस्त्यावर फेकून आपला संताप व्यक्त केला.संग्रामपूर येथे मंगळवारी झालेल्या या आंदोलनात शेतकर्‍यांसह युवक काँग्रेस व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्तेसुद्धा सहभागी झाले होते. तालुक्यातील काथरगाव येथील शेतकर्‍यांनी २२ एकर क्षेत्रात जानेवारी महिन्यामध्ये नामधारी ७५0 या टरबूज बियाण्यांची लागवड केली होती; मात्र जानेवारीत बियाणे लागवड केल्यानंतरही चार महिने उलटले, तरी या टरबुजाच्या वेलाला टरबूज न लागल्याने तसेच लागली तर फळांचा दर्जा व आकारमानावर फरक पडला. त्यामुळे फळाचे वजन २00 ते ४00 ग्रॅमच असल्यामुळे व फळाचा आकार बेडौल असल्यामुळे संबंधित शेतकर्‍यांनी नामधारी ७५0 कंपनीकडून नुकसान भरपाई द्यावी, करिता कंपनीच्या रिजनल मॅनेजरकडे मागणी केली, तसेच तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्याकडेसुध्दा टरबूज बियाणे बोगस निघाल्याची तक्रार केली. यानंतर शेतकरी तक्रार निवारण समितीने बियाणे बोगस व सदोष असल्याचा अहवाल पंचायत कृषी अधिकार्‍याकडे दिला; मात्र अहवाल प्राप्त होऊनही कंपनीकडून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे अखेर शेकडो शेतकर्‍यांनी व युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी तसेच संभाजी बिग्रेडच्या पदाधिकार्‍यांनी १९ एप्रिल रोजी बियाण्यांच्या पाकिटाची होळी करून तसेच टरबूज रस्त्यावर फोडून अभिनव आंदोलन केले.