शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अरे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:04 IST

तालुक्यातील अमडापूर येथील संतप्त शेतकर्‍यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ असा सवाल केला आहे. त्यामुळे भाजपावर त्यांचेच अस्त्न उलटल्याचे दिसते.

ठळक मुद्दे अमडापूर येथे संतप्त शेतकर्‍यांनी लावले फलक 

सुधीर चेके पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: गत विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान भारतीय  जनता पार्टीने ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ या ‘कॅचलाइन’चा प्रभावीपणे वापर करून राज्याची सत्ता मिळविली. हीच ‘कॅचलाइन’आता भाजपासाठी ‘बुमरँग’ ठरत असून, भाजपा सरकारने शेतकर्‍यांना दिलेल्या आश्‍वासनांचा पडलेला विसर आणि शेतकर्‍यांसमोरील अनंत अडचणी, या पृष्ठभूमीवर तालुक्यातील अमडापूर येथील संतप्त शेतकर्‍यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ असा सवाल केला आहे. त्यामुळे भाजपावर त्यांचेच अस्त्न उलटल्याचे दिसते.राज्यात भाजपाच्या फडणवीस सरकारला सत्तेत येऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या तीन वर्षात भाजपाने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळण्याऐवजी शेतकर्‍यांपुढील समस्या दिवसागणिक वाढत असल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र रोष असून, हाच रोष व्यक्त करण्यासाठी तालुक्यातील अमडापूर येथील समाधान खेन्ते व अरुण पद्मने या दोन शेतकर्‍यांनी बसस्थानक परिसरात ‘अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असे बॅनर लावून भाजपाला जाब विचारत आहेत. सोयाबीन, कापूस, तुरीसह इतर कडधान्याचे १0 वर्षांपूर्वीचे भाव दिल्याबद्दल तसेच शेतकर्‍यांचा माल बाजारपेठेत येण्याअगोदर विदेशातून माल बाजारपेठेत आणून शेतकर्‍यांच्या मालाचे भाव पाडल्याबद्दल, शेतकर्‍यांनी ३ वर्षात जीडीपी १२ टक्के केला; परंतु तुम्ही शेतकर्‍यांचा जीडीपी 0 टक्के केला, जगाच्या पोशिंद्याला चुकीचे धोरण राबवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, शेतकरीविषयक चुकीचे धोरण राबवून एक पिढी बरबाद केली आणि तत्त्वत: १00 टक्के फसवी कर्जमाफी दिल्याबद्दल भाजपा सरकारचे उपहासात्मक अभिनंदन या बॅनरद्वारे या शेतकर्‍यांनी केले आहे. मध्यंतरी सोशल मीडियावरदेखील भाजपला शेतकरी व इतर मुद्यांवरून लक्ष्य करीत याच कॅचलाइनद्वारे प्रश्न उपस्थित केल्या जात होते. त्यात आता शेतकर्‍यांनी बॅनर लावून थेट सरकारला  जाब विचारण्यासह ‘१0 वष्रे मागे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा !’ असे नमूद करून आपला रोष व्यक्त केल्याने हा विषय सध्या सर्वत्र चर्चेचा ठरला आहे. 

‘होय मी लाभार्थी.’चीही खिल्लीभाजपच्या ‘कुठे नेऊन ठेवला..’ प्रमाणेच सध्याच्या ‘होय मी लाभार्थी’ या जाहिरातीवरूनही अमडापूर येथील शेतकर्‍यांनी सरकारवर टीका करताना ‘होय मी लाभार्थी, चुकीच्या धोरणांचे, हे माझं सरकार.’ असे नमूद करून सरकारवर सडकून टीका केली आहे. याशिवाय सोशल मीडियावरदेखील सध्या ‘होय मी लाभार्थी’च्या ‘जोक्स’ने अक्षरश: धुमाकूळ घातलेला आहे.  

टॅग्स :State Governmentराज्य सरकारchikhali roadचिखली रोड