शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

हिवरा आश्रम : शेतकर्‍यांच्या परिश्रमाला जलयुक्त शिवारची जोड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:38 IST

हिवरा आश्रम: लव्हाळा येथील मोहखेड शिवारातील शेतकर्‍यांनी मेहकर तालुका कृषी विभागाच्या वतीने नाल्यावर सिमेंट बांधाचे काम केल्यामुळे सध्या वाहून जाणारे पाणी अडवून शेतीचे हंगामी सिंचन करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या परिश्रमाला कृषी विभागाच्या जलयुक्त शिवाराची जोड मिळाल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देवाहून जाणारे पाणी सिमेंट नाला बांधामुळे अडविले शेतीच्या सिंचनाची झाली सोय

ओमप्रकाश देवकर । लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम: लव्हाळा येथील मोहखेड शिवारातील शेतकर्‍यांनी मेहकर तालुका कृषी विभागाच्या वतीने नाल्यावर सिमेंट बांधाचे काम केल्यामुळे सध्या वाहून जाणारे पाणी अडवून शेतीचे हंगामी सिंचन करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या परिश्रमाला कृषी विभागाच्या जलयुक्त शिवाराची जोड मिळाल्याचे दिसून येत आहे. मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथील मोहखेड शिवारात शिवदास अमृता सवडतकर यांची शेती आहे. या नाल्यातून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाणी वाहत असे. हे वाहून जाणारे पाणी सवडतकर यांनी बर्‍याच वेळा अडविले. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा मातीचा बांधसुद्धा टाकला; पण पाणी पूर्णत: अडविल्या जात नसे. शिवदास सवडतकर यांची जमीन याच नाल्याच्या बाजूबाजूला आहे. त्यांच्याकडे विहीर आहे, परंतु पूर्णपणे सिंचन होत नाही. सवडतकर व इतर शेतकर्‍यांची पाण्यासाठीची मेहनत बघता सन २0१६-१७ मध्ये जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कृषी पर्यवेक्षक विनोद मोरे, कृषी सहायक दीपक बोरे यांनी मंडळ कृषी अधिकारी मारोती तोडकर व तालुका कृषी अधिकारी विजय सरोदे यांच्या मार्गदर्शनात सदर नाल्यावर सिमेंट बांधाचे काम पूर्ण केले. या कामाची फलo्रुती या खरीप व रब्बी हंगामातसुद्धा दिसून येत आहे. या सिमेंट बांधामुळे वाहून जाणारे पाणी अडविल्या गेल्याने या नाल्यात पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गुरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध तर आहेच शिवाय यावर्षीच्या सोयाबीन, तूर, हरभरा या पिकांचेसुद्धा हंगामी सिंचन केले. या जलयुक्त शिवार अभियानाचा सिमेंट बांधामुळे रामकोरबाई आमृता सवडतकर, भानुदास गणेश कंकाळ, संजय दशरथ कंकाळ, विनोद मदन देशमुख व इतर शेतकर्‍यांना याचा चांगला उपयोग होत आहे. 

पूर्वी या नाल्याचे पाणी वाहून जात होते; मात्र सिमेंट बांधामुळे ते पाणी अडविल्या जात असल्याने शेतकर्‍यांना हंगामी सिंचन करता येणे शक्य झाले आहे. या सिमेंट बांधाची व नाल्याची या पुढील काळजी शेतकर्‍यांनी घ्यावी म्हणजे शेतीला फायद्याचे होईल.- विजय सरोदे, तालुका कृषी अधिकारी, मेहकर

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalyukt Shivarजलयुक्त शिवार