शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वारसा : सुनगावचे प्राचीनत्व सिद्ध करणारी तीन मजली विहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 20:34 IST

विटांमध्ये बांधकाम असलेली ही विहीर मध्ययुगीन कालखंडातील आहे.

ठळक मुद्दे जळगाव जामोद तालुक्यात सुनगाव येथे तीन बारव आहेत.गावाच्या बाहेर एका शेतामध्ये तीन मजली विहीर आहे. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दोन्हीकडून रस्ता आहे.

- विवेक चांदूरकर खामगाव :  बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात सुनगाव येथे तीन बारव आहेत. या गावात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या तीन विहिरी- बारव या वेगवेगळ्या कालखंडात बांधण्यात आल्या आहेत. या तीनही विहिरींमधून सुनगाव येथे प्राचीन काळापासून वस्ती होती. हे सिद्ध होते. गावात आवजी महाराजांचे प्रसिद्ध मंदिर आहे. तसेच महादेवाचीही पुरातन काळातील दोन मंदिरे आहेत.  गावात असलेल्या एका महादेव मंदिरातीला मढीचे मंदिर म्हणतात. हे मंदिरही बरेच जुने आहे. मंदिराचे आता नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. मात्र मंदिरातील खांब व गर्भगृहाच्या प्रवेशव्दारावरून मंदिर जुने असल्याचे निदर्शनास येते. या मंदिरासमोर असलेली विहिर पूर्णता दगडाची आहे. बांधकामावरून ही विहीर यादव काळाच्या पूर्वी बांधली असल्याचा अंदाज आहे. इतिहास संशोधक डॉ. शाम देवकर यांनी ही विहीर चालुक्य काळातील असल्याचे सांगितले. तसेच गावात आणखी असलेल्या महादेवाच्या मंदिराला सराईचे मंदिर म्हणून ओळखल्या जाते. या मंदिरासमोरही एक विहीर आहे. विटांमध्ये बांधकाम असलेली ही विहीर मध्ययुगीन कालखंडातील आहे. या मंदिरात एक भुयार आहे. गावाच्या बाहेर एका शेतामध्ये तीन मजली विहीर आहे. या विहिरीला चोराची विहीर म्हणतात. विटा आणि चुना-मातीत या विहिरीचे बांधकाम केले आहे. या विहिरीत तीन मजले आहेत. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दोन्हीकडून रस्ता आहे. डाव्या बाजुकडील रस्ता मलबा पडल्यामुळे बंद झाला आहे. येथे असलेल्या कमानीमध्ये सध्या शिवलिंग ठेवले आहे. मध्यातल्या मजल्यावर जाण्यासाठी छोटेसे भूयार आहे. दुसºया मजल्यावरूनच खालच्या मजल्यावर जाण्यासाठी पायºया आहेत. या विहिरीचे बांधकाम मूगलपूर्व काळात झाल्याचे बांधकामावरून निदर्शनास येते. पूर्वीच्या काळात या विहीरीत चोरांचे वास्तव्य असावे, त्यामुळे चोरांची विहीर म्हटल्या जाते. गावात असलेल्या नागरिकांच्या पाण्याची व्यवस्था करण्याकरिता विहिरी व बारवचे बांधकाम करण्यात येत होते. या गावात असलेल्या तीन विहिरी व त्यांचा वेगवेगळा कालखंड पाहता गावात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असावी असा अंदाज आहे.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदkhamgaonखामगाव