शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जनुना तलावाच्या खोलीकरणासाठी विदेशातून मदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 14:05 IST

खामगाव : येथील ऐतिहासिक जनुना तलावातील गाळाचा उपसा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘लोक’चळवळीला उत्स्फूर्त मदत मिळत असल्याचे दिसून येते.  

- अनिल गवई

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : येथील ऐतिहासिक जनुना तलावातील गाळाचा उपसा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘लोक’चळवळीला उत्स्फूर्त मदत मिळत असल्याचे दिसून येते.  विदेशातूनही मदतीचा ओघ वाढला असून सामाजिक जाणिवेतून अनिवासी भारतीयांनी खोलीकरणासाठी आतापर्यंत जवळपास ५० हजाराचा निधी एका सामाजिक संस्थेच्या खात्यात जमा केला आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत रोटरीच्या खात्यात अडीच लाखांची रक्कम जमा झाल्याचे समजते.

खामगाव येथील पुरातन जनुना तलावातील गाळाचा उपसा करण्यासाठी नगर पालिका प्रशासन, भारतीय जैन संघटना आणि रोटरी क्लबच्या पुढाकारात ‘लोक’चळवळ उभी करण्यात आली. गाळ उपसा मोहिमेसाठी भारतीय जैन संघटनेने मोफत जेसीबी आणि पोकलॅन्ड मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. तर केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगीस्ट संस्थेने १ लाख ११ हजार रूपयांची मदत दिली. त्यापाठोपाठ खामगाव नगर पालिका कर्मचाºयांनी  एक दिवसांचे वेतन दिले. तलावाच्या खोलीकरणासाठी एकदिवसाच्या वेतनासाठी पालिका कर्मचाºयांना ऐच्छीक आवाहन करण्यात आले होते. मात्र, मुख्याधिकाºयांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पालिकेच्या सर्वच विभागातील कर्मचाºयांनी स्वत:हून एकदिवसाचे वेतन दिले. यामध्ये महिला कर्मचाºयांचा सहभाग उल्लेखनिय असाच आहे. स्थानिक सामाजिक संस्था आणि विदेशी मदत मिळून शुक्रवारपर्यंत रोटरीच्या खात्यात अडीच लाख रुपयांची रक्कम जमा झाल्याचे समजते.

 

‘तरूणाई’चे श्रमदान!

जनुना तलावाच्या खोलीकरणासाठी स्थानिक सामाजिक संस्थांकडून मदतीचा ओघ सुरू असतानाच, तरूणाई फांउडेशनच्यावतीने श्रमदानातून गाळ काढण्यात येणार आहे. यासाठी विविध सामाजिक संस्थांचीही मदत घेण्यात येईल.

अनिवासी भारतीयांकडून मदतीचा ओघ!

मूळ भारतीय वंशाच्या अनिवासी भारतीयांनी सामाजिक दायित्व म्हणून जनुना तलावाच्या खोलीकरणासाठी लंदन येथील निलेश गोकुलदासजी राठी यांनी ११ हजार रुपये, दुबई येथील राजेश बजाज यांनी ११ हजार रूपये आणि आॅस्ट्रेलिया येथील शीतल सातपुतळे यांनी ५००० हजार रुपये दिलेत. त्याचप्रमाणे भोपाळ, अमित कॉटन आणि दिल्ली येथील तिघांजणांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. तर दोन जणांनी प्रत्येकी पाच हजार अशी दहा हजाराची निनावी मदत असे एकुण ५२ हजार आणि नगर पालिका कर्मचारी संघटना व केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असो.ची १ लाख ११ हजाराची मदत मिळून शुक्रवार (१२ एप्रिलरोजी दु. १२ वाजेपर्यंत) रोटरीच्या खात्यात अडीच लाख रूपये जमा झाल्याचे रोटरीचे प्रकल्प व्यवस्थापक देवेश भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

 

जनुना तलावाच्या खोलीकरणासाठी बीजेएस सोसायटी, रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे. पालिका प्रशासनाचे या उपक्रमाला संपूर्ण सहकार्य असून, पालिका कर्मचाºयांनी एक दिवसाचे वेतन दिले. त्याचप्रमाणे शहरातील इतर सामाजिक संघटनांचाही उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. ही खामगाव शहरासाठी आनंददायी बाब आहे.

- धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव.

जनुना तलाव हे खामगावचे वैभव आहे. जलसंवर्धनासाठी पाणी फांउडेशनच्या उपक्रमात ‘तरुणाई’सहभागी आहे. जनुना तलावाच्या खोलीकरणासाठी श्रमदानासाठी तरूणाईचा पुढाकार राहणार आहे.

- उमाकांत कांडेकर, सहसचिव तरुणाई फाऊडेशन, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा