शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:22 IST

बुलडाणा : विजांच्या कडकडाटासह शुक्रवारी सकाळी दहा  ते बारा वाजताच्या दरम्यान तब्बल दोन तास जिल्ह्यात  जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक  खोळंबली तर जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे शे तकर्‍यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून,  िपकांच्या नुकसानीमुळे चिंता व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देजनजीवन विस्कळीत अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबलीसिमेंट बांध ‘ओव्हर फ्लो’

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : विजांच्या कडकडाटासह शुक्रवारी सकाळी दहा  ते बारा वाजताच्या दरम्यान तब्बल दोन तास जिल्ह्यात  जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक  खोळंबली तर जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे शे तकर्‍यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून,  िपकांच्या नुकसानीमुळे चिंता व्यक्त होत आहे.गुरुवारी रात्री रिमझिम पाऊस आल्यानंतर शुक्रवारी सकाळी  ढगाळ वातावरण होते. दरम्यान, सकाळी ९ वाजताच्या  सुमारास विजेच्या कडकडाटासह सर्वत्र जोरदार पावसाला  सुरुवात झाली. सतत दोन तास पावसाचा जोर कायम  राहिल्यामुळे अनेक ठिकाणच्या नाल्यांना पूर आला. या  पावसामुळे शहरातील रामनगर, धाड नाका, जयस्तंभ चौक,  जनता चौक, कारंजा चौक, जांभरूण रस्ता, संगम चौक  आदी ठिकाणी पाणी जमा झाल्यामुळे वाहतूक खोळंबली हो ती. पावसाच्या जोरामुळे बुलडाणा-मलकापूर मार्ग काही  काळ बंद ठेवावा लागला तर रात्री झालेल्या रिमझिम पाऊस  व सकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे सागवन परिसरात  असलेल्या पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे चिखली रस् त्यावरील पुलावर पाण्याचा जलस्तर वाढला. त्यामुळे काही  काळासाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दुपारी  पुलावरील पाणी ओसरल्यामुळे वाहतूक सुरू करण्यात  आली.या पावसामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बसस् थानक परिसरात मोठय़ा संख्येने उपस्थित प्रवाशांना वाहतूक  बंद असल्यामुळे थांबावे लागले. पावसाचा अंदाज घेत प्र त्येक बस सोडण्यात येत असल्यामुळे अनेक प्रवासी बसस् थानक परिसरात दिसून आले. दुपारी पावसाने उघडीप  दिल्यानंतर सर्वत्र धुके पसरले होते. या काळात लाइन बंद  झाल्यामुळे त्याचा व्यापार्‍यांना मोठय़ा प्रमाणात फटका  बसला. 

सिमेंट बांध ‘ओव्हर फ्लो’देवधाबा : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने ओढ  दिल्याने कापूस, मका, ज्वारी, तूर या पिकांना पावसाची तीव्र  आवश्यकता असताना गुरुवारी दुपारी व शुक्रवारी पहाटे  पडलेल्या दमदार पावसाने खरिपाची तृष्णा तृप्ती केल्यानंतर  भविष्याच्या पाणीटंचाई दूर करण्यास हातभार लागणारे सिमेंट  बंधारेही या पावसाने ओव्हर फ्लो झाले असून, देवधाबा  परिसरातील नाल्यांनाही आता पाणी वाहू लागले आहे.  हिंगणा काझी येथील व्याघ्रा नदीलाही यावर्षी पहिल्यांदा पाणी  वाहू लागले असल्याने त्याचा हातभार भविष्यातील  सिंचनाकरिता लागणार आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्ग त खडकी या गावाजवळील बांधलेले सिमेंट बांध आता  ओव्हर फ्लो झाले असून, त्यामध्ये बर्‍याच प्रमाणात  पाणीसाठा निर्माण होणार असल्याने या परिसरातील  विहिरींच्या पाणी पातळीत यामुळे वाढ नक्कीच होणार आहे. 

नालीतील पाणी घरात शिरलेबिबी : लोणार तालुक्यातील चोरपांग्रा येथील वॉर्ड क्र.३  मधील दोन नागरिकांच्या घरात नालीचे पाणी गेल्याने  नुकसान झाले. चोरपांग्रा परिसरात झालेल्या पावसामुळे  नालीतून पाणी ओसंडून वाहल्याने घरात शिरले. ग्रामपंचाय तने नालीची खोली कमी केली असल्याने घरामध्ये पाणी  घुसले, असे नुकसानग्रस्तांचे म्हणणे आहे. नालीचे पाणी  दोन घरात घुसल्याने मोठे नुकसान झाले. यात वॉर्ड क्र.३  मधील भगवान अभिमान इंगळे, अरुण आश्रुबा पिंपळे या  दोघांच्या घरामध्ये नालीतील पाणी घुसले. त्यामुळे भगवान  इंगळे यांच्या घरातील गहू, ज्वारी, दाळ व कपडे याचे  नुकसान झाले आहे.

दुसरबीड परिसरात दमदार पाऊसदुसरबीड  : गेल्या तीन दिवसांपासून उकाड्याने हैराण  झालेल्या नागरिकांना शुक्रवारी सकाळी झालेल्या जोरदार  पावसाने हायसे वाटले. दुसरबीड महसूल मंडळामध्ये  केशवशिवणी, तढेगाव, बारलिंगा, हिवरखेड, जऊळका,  िपंपळगाव कुडा, रुम्हणा, देवखेड, जांभोरा यासह विविध  ठिकाणी सुमारे दोन तास पावसाच्या सरी कोसळल्या.  दुसरबीडमध्ये जोरदार पावसामुळे रस्त्यावरील व्यावसायिक  तसेच अंतर्गत रस्त्यांमुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती.  गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे कमालीचा  उकाडा जाणवत होता. दरम्यान, पावसामुळे गावामधील अं तर्गत रस्ते पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले होते.