नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी
माेताळा : ८ व ९ सप्टेंबर राेजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ अनेक बांध फुटल्याने पिके वाहून गेली आहेत़ नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़
नागरिकांना मास्कची ॲलर्जी
बुलडाणा : काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने नागरिक काेराेनाविषयी बिनधास्त झाल्याचे चित्र आहे़ अनेक जण विनामास्क फिरत असल्याचे चित्र बाजारात असते़ नगरपालिका प्रशासनाने पथके स्थापन करून काेराेनाविषयक नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे़
सुंदरखेड परिसरात अंतर्गत रस्त्याची दुरवस्था
बुलडाणा : शहराला लागूनच असलेल्या सुंदरखेड परिसरात अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे़ रस्त्यावर सततच्या पावसामुळे चिखल साचला असून अनेक ठिकाणी माेठमाेठे खड्डे पडले आहेत़. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे़
१८७० रुग्णांना जनआराेग्य याेजनेचा आधार
बुलडाणा : जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेत असलेल्या ९९४ रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळालेला नाही, परंतु १७८० रुग्णांना मात्र या योजनेचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात ही योजना राबवणारे २४ रुग्णालये असून २५ रुग्णालये ही योजना सुरु करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ही योजना राबवत असताना ३२५ लोकांनी या योजनेबाबत तक्रारीसुद्धा केल्या आहेत.
ग्रामीण भागातील रस्ते गेले खड्ड्यात
बुलडाणा : गत काही दिवसांपासून ग्रामीण भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे़ अनेक ठिकाणी माेठमाेठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहने कशी चालवावी, असा प्रश्न पडला आहे़ या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे़