शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

धुळ्यात पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:31 IST

सखल भागात पाणी साचले : पावसाच्या आगमनाने शहरवासिय सुखावले

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात बुधवारी दुपारी वरूणराजाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचले होते. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे धुळेकर सुखावले आहेत. पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी धुळ्यात पाऊस झाला नव्हता. रोजचा दिवस कोरडा जात असल्याने, शहरवासियांच्या चिंता वाढल्या होत्या. ऐन पावसाळ्यातही उन्हाळ्याप्रमाणेच उकाडा कायम होता. मात्र सोमवारपासूनच मान्सुन सक्रीय झाला असल्याने, सर्वत्र पाऊस होत आहे. धुळ्यातही वरूणराजाची कृपा होऊ लागली आहे.बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यातच अधुन-मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. मात्र दुपारी दोन वाजेच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची चांगलीच धांदल उडाली होती. अनेकांनी पावसापासून बचावासाठी दुकानांच्या शेडचा आधार घेतला होता. दरदार पावसामुळे शहरातील काही सखल भागात पाणी साचले होते. अंत्यत वर्दळीच्या असलेल्या पोलीस मुख्यालयासमोरील खोल रस्त्यातही पाणी साचल्याने या परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. साचलेल्या पाण्यातून  मार्ग काढतांचा दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत होती. अनेकांनी रस्त्यावर जास्त प्रमाणात पाणी साचल्याने मार्ग बदलणे पसंत केले होते. दरम्यान बुधवारी सायंकाळपर्यंत सूर्यदर्शन झाले नव्हते. सलग दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे. आतापर्यंत १२.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे