शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांमुळे शेगावकरांना स्वाइन फ्लूचा धोका!

By admin | Updated: July 1, 2017 00:03 IST

वातावरणातील बदलामुळे लागण होण्याची शक्यता अधिक

फहीम देशमुख। लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : राज्यातील मोठ्या शहरांमध्ये स्वाइन फ्लूने कहर केलेला असून, मोठ्या शहरातील हा आजार आता विदर्भात पोहचला आहे. पर्यटकांच्या पसंतीत प्रथम क्रमांकावर असलेल्या शेगाव शहराला स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे.बुलडाणा जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा जोर वाढल्याने स्वाइनचा धोका कमी होईल, असे वाटत असतानाच आता पावसाळा सुरु झाल्याने वातावरणात गारठा पसरला. परिणामी स्वाइन फ्लूला पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे.बदलेल्या वातारवणामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे सर्दी-खोकला झालेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. राज्यभरातून पर्यटक शेगावात पोहचत आहेत. लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे मागील आठवड्यात शेगाव हाऊसफुल्ल झाले होते. अशा परिस्थितीत इतर शहरातून आलेल्या एखाद्या रुग्णामुळे स्वाइन फ्लू या भागातही पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरजजिल्ह्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण असून, त्यांचे नमुनेच पाठविण्यात आले नसल्यामुळे निदान होत नसल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे प्रशासन मात्र हात झटकत असून, स्वाइन फ्लूचे रुग्णच नसल्याचा दावा करीत आहे. असे असले तरी जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा धोका सर्वात जास्त शेगाव शहराला आहे. याठिकाणी पर्यटक आणि राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता आरोग्य विभागाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.