शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील २७ लाख नागरिकांचे होणार आरोग्य सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 11:45 IST

ताप, दुर्धर आजार व शरीरातील आॅक्सीजनचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा कमी असणे या पैकी कोणतीही दोन लक्षणे आढळल्यास थेट संबंधित व्यक्तींना फिव्हर क्लिनीक किंवा कोवीड सुश्रूषा केंद्रात दाखल करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती व रुग्ण दुपटीचा वाढता वेग पाहता राज्य शासनाच्या निर्देशानुसार बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीची अर्थात २७ लाख नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण व तपासणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ताप, दुर्धर आजार व शरीरातील आॅक्सीजनचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा कमी असणे या पैकी कोणतीही दोन लक्षणे आढळल्यास थेट संबंधित व्यक्तींना फिव्हर क्लिनीक किंवा कोवीड सुश्रूषा केंद्रात दाखल करण्यात येणार आहे.येत्या १५ सप्टेंबरपासून ही दोन टप्प्यातील जम्बो मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात १५ दिवस व दुसऱ्या टप्प्यात दहा दिवस या प्रमाणे २५ आॅक्टोबर पर्यंत ही मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात ६०० पथके स्थापन करण्यात येणार असून या पथकांमध्ये प्रत्येकी एक डॉक्टर राहणार असून घरपरत्वे वैयक्तिकस्तरावर ताप, खोकला, दम लागणे, शरीरातील आॅक्सीजनचे प्रमाण आणि दुर्धर आजारांची माहिती घेवून लक्षणे आढळलेल्यांना त्वरित नजीकच्या फिव्हर क्लिनीकमध्ये दाखल केले जाईल. त्यानुषंगाने प्रत्येक पथकातील सदस्याकडे इन्फ्रारेड थर्मामिटर, पल्स आॅक्सीमीटर, सॅनिटायझरराहणार आहे.दुर्धर आजार असणारे व्यक्ती नियमित उपचार घेत आहे का? याची खात्री करण्यात येवून आवश्यक तेथे त्वरित तपासणी करण्यात येणार आहे. नागरी व ग्रामीण अशा दोन्ही भागात हे सर्वेक्षण होणार असून १३ सप्टेंबर रोजी या जम्बो मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन बैठक घेत आहे.कोरोनाचे जिल्ह्यात वाढते संक्रमण रोखण्यासाठी या उपाययोजना करण्यात येणार असून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये हे फिव्हर क्लिनिक म्हणून काम पाहणार आहेत. पहिल्या टप्प्यात तपासणी केलेल्या प्रत्येक घरावर एक स्टीकर लावण्यात येणार आहे. १५ दिवसात २७ लाख नागरिकांची जिल्ह्यात तपासणी करण्यात येवून यासाठीच्या अ‍ॅपमध्ये माहिती भरण्यात येणार आहे.असा राहील मोहिमेचा कालावधी‘माझे कुटुंब माजी जबाबदारी’ या शिर्षकाखाली ही मोहीम राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात १५ सप्टेंबर ते दहा आॅक्टोबर व दुसºया टप्प्यात १४ आॅक्टोबर ते २४ आॅक्टोबर या कालावधीत ही मोहिम राबविण्यात येणार असून गृहभेटी दरम्यान, प्रत्येक घरावर एक स्टीकर लावण्यात येणार आहे. या स्टीकरवर अ‍ॅपमध्ये भरलेली माहिती राहील.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या