आरोग्य विभागाच्या वतीने गावपातळीवर कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. अलाक्षणिक आजाराने ग्रस्त असलेल्या व लक्षणे असणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांची तपासणी आरोग्य अधिकारी व तज्ज्ञांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. या ठिकाणी उपरोक्त रुग्णांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार व इतर आजाराने ग्रस्त गावातील नागरिकांची या वेळी तपासणी करण्यात येऊन त्यांना ‘औषधी उपचार’ यावर योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी चांडोळ आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी एम. बी. अणे, प्रयोगशाळा तज्ज्ञ संदीप गडाख, प्रयोग शाळा साहाय्यक सुनील शिंदे, आरोग्य सेविका रंजना देशमुख, रामराव सोनुने, आरोग्य सेवक अरुण जाधव, आशा वर्कर वंदना रगडे, अंगणवाडी सेविका ज्योती मुरकुटे, वंदना सोनुने, अनिता सोनुने, कुसुम बिबे, आरोग्य साहाय्यक शीतलप्रसाद अहीर यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
कोरोना आजाराचे गंभीर परिणाम आणि परिस्थिती पाहता नागरिकांना स्वतःसह कुटुंबातील सदस्यांची योग्य काळजी घेण्यासाठी उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी प्रतिबंधक उपाय करण्याचे अवाहनही वैद्यकीय अधिकारी एम. बी. अणे यांनी केले आहे.