शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

चिखली तालुक्यात अवैध रेतीसाठा जप्त करून हर्राशीची कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:37 IST

चिखली : तालुक्यातील ब्रम्हपुरी-किन्होळा येथील शिव नदीतून अवैधरीत्या रेतीचा उपसा  होत असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाने नदीपात्राची पाहणी केली असता,  याठिकाणी आढळून आलेला रेतीसाठा जप्त केला व रात्रीच्या सुमारास हा रेतीसाठा चोरीला  जाण्याची शक्यता पाहता मोकास्थळीच त्याच्या हर्रासीची कारवाई केल्याने शासनाच्या  महसूलात भर पडली आहे.

ठळक मुद्देब्रम्हपुरी-किन्होळा येथील शिव नदीतून होत होता अवैध रेतीचा उपसा

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : तालुक्यातील ब्रम्हपुरी-किन्होळा येथील शिव नदीतून अवैधरीत्या रेतीचा उपसा  होत असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाने नदीपात्राची पाहणी केली असता,  याठिकाणी आढळून आलेला रेतीसाठा जप्त केला व रात्रीच्या सुमारास हा रेतीसाठा चोरीला  जाण्याची शक्यता पाहता मोकास्थळीच त्याच्या हर्रासीची कारवाई केल्याने शासनाच्या  महसूलात भर पडली आहे.ब्रम्हपुरी-किन्होळा शिव नदीतून अवैधरीत्या रेतीचा उपसा सुरू असल्याची माहिती  मिळाल्यानंतर तहसीलदार मनिष गायकवाड यांच्या निर्देशानुसार निवासी नायब तहसीलदार  रवींद्र कानडजे यांनी तलाठी अनिल जाधव व पथकासमवेत पाहणी केली असता, नदी पात्रात सुमारे १0 ब्रास रेतीचा अवैध साठा आढळून आला. दरम्यान, महसूल विभागाचे पथक येथे दाखल होणार असल्याची भनक लागल्याने अवैध  रेती उपसा करणार्‍यांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतला होता.  या रेतीसाठय़ावर कोणी दावादेखील न केल्याने पथकाद्वारे १0 ब्रास रेतीचा साठा महाराष्ट्र  जमीन महसूल अधिनियमानुसार जप्त करण्यात आला; मात्र हा रेतीसाठा नदीपात्रातच  असल्याने रात्रीच्यावेळी तो चोरीला जाण्याची शक्यता पाहता नायब तहसीलदार कानडजे,  तलाठी टेकाळे व इतरांच्या उपस्थितीत तातडीने हर्रासी करण्यात आली. यामध्ये किन्होळा  येथील विजय हाडे यांनी १८ हजार रुपयांची सर्वाधिक बोली लावल्याने त्यांच्या नावाने  हर्रासी कायम केल्याने या माध्यमातून शासनाला १८ हजाराचा महसूल मिळाला आहे.

४७ हजारांची दंडात्मक कारवाईडोणगाव : येथून जवळच असलेल्या ग्राम लोणी गवळी येथे पांगरखेड येथे कार्यक्रमास जात  असताना अपर जिल्हाधिकारी दुबे, तहसीलदार संतोष काकडे, मंडळ अधिकारी येऊल  यांना लोणी गवळी जवळ अवैध रेती वाहतूक करणारे दोन वाहने आढळली. या वाहनांना  थांबवून अपर जिल्हाधिकारी दुबे यांनी ४७ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. अपर  जिल्हाधिकारी दुबे हे लोणी गवळीवरून पांगरखेड येथे कार्यक्रमास जात असताना  शुक्रवारला सकाळी ११.३0 वाजता ट्रॅक्टर क्र.एम.एच.३७ एफ २१८९ व टिप्पर  क्र.एम.एच.४0 वाय ९९२३ हे अवैध रेती वाहतूक करताना आढळून आले. या वाहनांमध्ये  सव्वा तीन ब्रास रेती आढळून आल्याने सदर वाहनांचा पंचनामा तलाठी अमोल राठोड यांनी  करून सदर दोन्ही वाहनांवर ४७ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने  अवैध रेती वाहतूक करणारांचे धाबे दणाणले आहे, तर मेहकर तालुक्यात सकाळ व  संध्याकाळ अवैध वाहतूक रेती करणारी वाहने आढळून येतात, यावर कडक कारवाई होणे  गरजेचे आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा