शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

हजारो हेक्टवरील हरभऱ्यावर ‘कटवर्म’चे भीषण संकट; हजारो हेक्टरवरील रोपे फस्त

By विवेक चांदुरकर | Updated: December 9, 2023 19:13 IST

शेकडो हेक्टरवरील हरभऱ्याचे पीक मोडले

विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव जि. बुलढाणा): हरभरा पिकावर हरभऱ्याचे रोप कुरतडणारी अळी (कटवर्म) चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे हजारो हेक्टरवरील हरभऱ्याचे पीक धोक्यात आले असून, अनेक शेतकर्यांनी पीक मोडण्याला सुरूवात केली आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभर्याची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र, हरभऱ्यावर कटवर्म किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गत दहा दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे या किडीला पोषक वातावरण मिळाले. त्यामुळे जमिनीमध्ये कोषात असलेली अळी बाहेर आली असून, हरभऱ्याच्या छोट्या रोपांची शेंडे कुरतडत आहे. या किडीने हजारो हेक्टरवरील हरभऱ्याचे पीक फस्त केले आहे. शेतकरी महागडी औषधांची फवारणी करीत आहेत. मात्र तरीही अळी आटोक्यात येत नसून नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक शेतकर्यांनी सोयाबिनचे पीक मोडण्याला सुरूवात केली आहे.

वानखेड येथील देविदास उत्तम वरपे यांनी दहा एकरातील हरभऱ्याचे पीक मोडले आहे. त्यांनी हरभर्याची पेरणी केली होती. मात्र कटवर्मचा प्रादुर्भावाने शेतातील हरभऱ्याच्या रोपांचे शेंडे खुडले. त्यामुळे त्यांनी दहा एकरातील पीक मोडले. पेरणीकरिता त्यांना ६० हजार रूपये खर्च आला होता. त्यांना नुकसान सहन करावे लागणार असून, दुबार पेरणी करावी लागणार आहे.

-------

कांद्याचेही कटवर्ममुळे नुकसान

कांदा पिकावरही कटवर्म किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कांदा पिकाचे नुकसान होत आहे. वानखेड येथील दीपक हागे यांच्या शेतातील एका एकरातील कांदा पीक कटवर्ममुळे पुर्णता उद्धवस्त झाले आहे. हागे यांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे.

-------

मी एक एकर शेतामध्ये कांदा पिकाची पेरणी केली आहे. याकरिता हजारो रूपये खर्च केले. मात्र गत तीन ते चार दिवसांपासून कांदा पिकावर कटवर्म किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कांदा पीक उद्धवस्त झाले आहे.-दीपक हागे, कांदा उत्पादक शेतकरी, वानखेड

-------

मी दहा एकरात हरभऱ्याची लागवड केली होती. यावर्षी अवकाळी पावसाने हरभऱ्याला फायदा होणार, अशी शक्यता होती. मात्र, धुक्यामुळे हरभरा सुकला आहे. त्यातच किडींच्या प्रादुर्भावामुळे हरभऱ्याच्या झाडांची शेंडे खुडली आहेत. त्यामुळे दहा एकरातील पीक मोडले आहे.-देविदास उत्तम वरपे, शेतकरी, वानखेड

-------

हरभरा पिकावर कटवर्म या हरभऱ्याचे रोप कुरतडणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. अवकाळी पावसाने किडींना पोषक वातावरण मिळाल्याने कीड कोषातून बाहेर आल्याने प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी दोन अळ्या प्रतिमीटर ओळ आढळून आल्यास क्लोरपायरीफाॅस २० टक्के इसी ५० मिली किंवा क्लोरॅट्रनिपाॅल १८.५ टक्के ३ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच अन्य उपाययोजना करायला हव्यात.-अनिल गाभने, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद

टॅग्स :buldhanaबुलडाणा