शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानगंगा अभयारण्य विस्ताराच्या हालचाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 12:12 IST

Gyanganga Sanctuary जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्र हे ज्ञानगंगा अभयारण्यात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  एक वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून बुलडाणा शहरालगत असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावलेल्या टी-१ सी-१ वाघामुळे बुलडाणा जिल्ह्यातील टायगर कॅरिडॉरला चालना मिळाली असून, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूच्या सूचनेनुसार या अभयारण्याचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहे. त्यानुषंगाने प्रादेशिक वन विभागांतर्गतचे जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्र हे ज्ञानगंगा अभयारण्यात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अद्याप त्यास अंतिम स्वरूप देण्यात आले नसले, तरी तसे सर्वेक्षणही वन्यजीव विभागाने केले असल्याची माहिती वन्यजीव विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. या आधीच ज्ञानगंगात स्थिरावलेल्या टी-१ सी-१ वाघाच्या मेटिंगसाठी अभयारण्यात वाघिणी सोडण्याच्या दृ्ष्टीने वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अनुमती दर्शवली आहे. तसा अहवालही त्यांनी पाठविला आहे. यासोबतच ज्ञानगंगा अभयारण्यात प्रती चौरस किमी १८.२३ तृणभक्षी प्राणी असल्याने वाघांसाठीचे खाद्य येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परिणामी वाघांच्या अधिवासासाठी ज्ञानगंगा अभयारण्य उपयुक्त आहे हे स्पष्ट झाले आहे. मात्र, २० वाघांच्या रहिवासासाठी ८०० ते १०० चौ. किमी क्षेत्र आवश्यक असते. भविष्यात येथे वाघांची संख्या वाढल्यास त्यांच्यासाठी टायगर कॉरिडॉर असावा त्या दृष्टीनेही काटेपूर्णा, अंबाबरवा आणि जळगाव खान्देशमधील भवानी  अभयारण्याचा विचारही करण्यात येत आहे. आता ‘ज्ञानगंगा’च्या विस्ताराच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. बुलडाणा, मोताळा आणि खामगाव तालुक्यांतील प्रादेशिक वनविभागांतर्गत येणारा भाग हा ज्ञानगंगा अभयारण्यात समाविष्ट केला जाऊ शकतो. 

व्याघ्र संवर्धन समितीच्या बैठकीची गरजगेल्यावर्षी कोरोना संसर्गाच्या काळात दोन वेळा व्याघ्र संवर्धन समितीची बैठक झाली होती. आता कोरोनाचा प्रकोप काही प्रमाणात मर्यादित झाला आहे. लसीकरणही सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर  मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक एम. एस. रेड्डी अध्यक्ष असलेल्या या व्याघ्र अधिवास समितीची आता नव्याने एक बैठक होण्याची गरज आहे. या समितीमध्ये वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियो डॉ. बिलाल हबीब, अकोला वन्यजीव विभागीय अधिकारी एम. एन. खैरनार व अन्य काही सदस्यांचा समावेश आहे.

टॅग्स :dnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यbuldhanaबुलडाणा