शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात ८१ हजारांचा गुटखा पकडला; दुचाकी, चारचाकीवाहनासह ४ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त

By अनिल गवई | Updated: September 12, 2023 13:02 IST

सादीक खान याच्या जवळून ७४, हजार ५५० रुपयांचा पान मसाला, गुटखा आणि तंबाखू जन्य साहित्य जप्त करण्यात आले.

खामगाव: अवैध गुटख्याची चोरट्याची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीवरून उपविभागीय अधिकारी पथकाने सोमवारी उशीरा रात्री छापा मारला. या कारवाईत ८१ हजार रुपयांच्या प्रतिबंधित गुटख्यासह एक दुचाकी, कार आणि तत्सम साहित्य असा एकुण ४ लक्ष २२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.ना.सुधाकर थोरात यांनी हिवरखेड पोलीसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, अवैध गुटख्याची चोरी छुपे वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहिती मिळाली. या माहितीची खात्री पटल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने फत्तेपूर घाट, हनुमान मंदीर जवळ घाट हनुमान मंदिराजवळ सापळा कारवाई केली. यात सादीक खान बिस्मिला खान ३७, रा. लाखनवाडा, राष्ट्रपाल निरंजन वानखेडे ३३, रा. आंबेटाकळी यांना दोघांना ताब्यात घेण्यात आले.

सादीक खान याच्या जवळून ७४, हजार ५५० रुपयांचा पान मसाला, गुटखा आणि तंबाखू जन्य साहित्य जप्त करण्यात आले. त्याचवेळी एमएच २८ व्ही ४५०८ ही तीन लाख रुपये किंमतीची जुनी कार जप्त करण्यात आली. तर राष्ट्रपाल वानखेडे याच्याकडून ७१५० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि चाळीस हजार रूपये किंमतीची एम एच २८ ए एल ७८३९ ही दुचाकी जप्त करण्यात आली. दोन्ही आरोपींकडून एकत्रित ८१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून उपरोक्त आरोपींविरोधात भादंवि कलम ३२८, १८८, २७२, २७३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास हिवरखेड पोलीस स्टेशनचे स.फो. आनंदा वाघमारे करीत आहेत.

प्रतिबंधित गुटख्याची खामगावातून वाहतूक

प्रतिबंधित गुटख्याची खामगाव शहरातून सर्रास वाहतूक केली जात आहे. खामगाव येथून चिखली, दे. राजा आणि बुलढाणा येथे गुटखा पोहोचविल्या जात आहे. यापूर्वीही बुलढाणा पोलीसांनी खामगाव येथील चांदमारीतील एका आरोपीला अटक केली. त्याच्या जवळून गुटखा साठा जप्त केला होता. सुत्रधारावर कोणतीही कारवाई होत नसल्याने, गुटखा तस्करीत वाढ होत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा