शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

चिखली, सिंदखेडराजात २.४० लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 13:24 IST

चिखली येथे दोन ठिकाणी छापा मारून छुप्या पद्धतीने विक्री होत असलेल्या गुटख्याचा साठा जप्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अमरावती येथील अन्न व औषध प्रशासन अधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या एका चमुने चिखली येथे दोन ठिकाणी छापा मारून छुप्या पद्धतीने विक्री होत असलेल्या गुटख्याचा साठा जप्त केला आहे. एक लाख २४ हजार ७२० रुपये किंमतीचा हा गुटख्याचा साठा आहे. दरम्यान, सिंदखेड राजा येथेही एक लाख १६ हजार रुपयांचा असा एकूण दोन लाख ४० हजार ७७० रुपयांचा हा गुटखा जप्त करण्यात आला आहे.चिखलीतील बाबुलाल चौकातील मे. के. जी. एन. पान मटेरीलय आणि पंकज जोशी यांच्या राहते घर येथे हा छापा टाकण्यात येऊन हा गुटखा जप्त करण्यात आला आहे. यात मे. के. जी. एन. पान मटेरीयल यांच्याकडून ९४ हजार ९५० आणि पंकज जोशी यांच्याकडून २९ हजार ७७७ रुपयांचा असा एकूण एक लाख २४ हजार ७२० रुपयांचा गुटखा आढळून आला. हा साठा अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी पुढील कार्यवही करीता जप्त केला. दरम्यान, प्रयोग शाळेत पडताळणीसाठी त्याचे नमुने घेण्यात आले असून नमुन्यांच्या विश्लेषणानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.या कारवाईत अमरावती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त एस. जी. अन्नापुरे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिल राठोड, अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे, गोपाल माहोरे, संदीप सुर्यवंशी यांनी सहभाग सहभाग घेतला होता.सिंदखेड राजातही सव्वा लाखांचा गुटखा जप्त४सिंदखेड राजा: शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर छुप्या पद्धतीने गुटखा विक्री होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिंदखेड राजा आणि शिवणी टाका येथे छापा टाकून एक लाख १६ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत सिंदखेड राजा येथील शेख हातीम रियाजोद्दीन आणि शिवणी टाका येथील मयुर अभिमान देशमुख या दोन गुटखा विक्रेत्यांच्या घरातून हा गुटखा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. सध्या हा जप्त केलेला गुटखा सिंदखेड राजा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने अन्न व औषध प्रशासनास अनुषंगीक पत्र पाठविण्यात आले असून त्यांच्याकडून गुटख्याची तपासणी केल्यानंतर संबंधीत विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक ठाणेदार शैलेश पवारयांनी दिली.  

मंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाई अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बुलडाणा येथील नागरी सत्कार कार्यक्रमात बुलडाणा जिल्हा हा गुटखा मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. तसा राज्यात गुटखा बंदीसंदर्भातील अध्यादेश २०१२ मध्येच काढण्यात आलेला असल्याचे स्पष्ट करत त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास आपण प्राधान्य देणार असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनास तसे निर्देश दिले होते. त्यासंदर्भाने आता अनुषंगीक कारवाई होत आहे.

 

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखलीSindkhed Rajaसिंदखेड राजा