शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गुरूदेव सेवा मंडळ जपते प्रबोधनात्मक कार्याचा ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 13:30 IST

बुलडाणा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आध्यात्मिक, सामाजिक वराष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधनात्मक कार्याचा ठेवा श्रीगुरूदेव सेवा मंडळअखंडपणे जपत आहे. जिल्ह्यात गेल्या २२ वर्षापासून समाजप्रबोधनालादेशभक्तीची सांगड घालून खेड्यापाड्यापर्यंत तुकडोजी महाराजांचे विचारपोहचविण्याचे कार्य गुरूदेव सेवा मंडळांकडून सुरू आहे.‘ग्रामविकासात राष्ट्राचा विकास’ अशी विचारसरणी डोळ्यासमोर ठेवूनमहाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीआध्यात्मिक, सामाजिक ...

ठळक मुद्देजिल्ह्यात २२ वर्षापासून चालते कार्य समाजप्रबोधनाला देशभक्तीची सांगड

बुलडाणा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आध्यात्मिक, सामाजिक वराष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधनात्मक कार्याचा ठेवा श्रीगुरूदेव सेवा मंडळअखंडपणे जपत आहे. जिल्ह्यात गेल्या २२ वर्षापासून समाजप्रबोधनालादेशभक्तीची सांगड घालून खेड्यापाड्यापर्यंत तुकडोजी महाराजांचे विचारपोहचविण्याचे कार्य गुरूदेव सेवा मंडळांकडून सुरू आहे.‘ग्रामविकासात राष्ट्राचा विकास’ अशी विचारसरणी डोळ्यासमोर ठेवूनमहाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीआध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन केले. जनसमुहालायोग्य रितीने कार्यप्रवृत्त करण्यासाठी सण १९३५ मध्ये अमरावतीजिल्ह्यातील गुरूकुंज मोझरी येथे श्रीगुरूदेव  धर्मसेवाश्रमाची वयुवकाकडून आष्टी येथे श्रीगुरूदेव आरती मंडळाची उभारणी करून शिस्तबद्धसंघटना सुरू केली. श्रीगुरूदेव आरती मंडळ शाखांचे श्रीगुरूदेव सेवामंडळनावाने पुनरूज्जीवन केले. बुलडाणा जिल्ह्यात श्रीगुरूदेव सेवा मंडळाचीशाखा २० नोव्हेंबर १९९५ पासून सुरू करण्यात आली. पण त्या अगोदर पासूनराष्ट्रसंताचे कार्य जिल्ह्यात सुरू होते. आचार्य हरीभाऊ वेरूळकर गुरूजीयांनी सर्वांगीण प्रशिक्षण वर्गाद्वारे जिल्ह्यातिलच नव्हेतर राज्यातीलबालक, तरूण आणि नागरिक सुसंस्कारित करण्याचे कार्य जवळपास १००पेक्षाजास्त वर्गाद्वारे सुरू आहे. श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या शाखेचेबुलडाणा जिल्हाध्यक्ष वाकोडे गुरूजी, सचिव प्रमोद दांडगे, प्रचारक दीपकमहाराज सावळे, प्रसिद्धी प्रमुख हरिदास खांडेभराड, गणेश राऊत, कृष्णकांतजोशी, गणेशराव डोईफोडे, रेखाताई खांडेभराड, वंदनाताई वाघ, रेखाताई खरातआदी कार्यकर्ते प्रबोधन, राष्ट्रसंत सहित्य प्रचार आणि प्रसाराचे अखंडकार्य करत आहेत. श्रीगुरूदेव सेवामंडळाकडून गावोगावी प्रबोधनात्मककार्यक्रम घेऊन तुकडोजी महाराजांचे विचार सर्वसामान्यांच्या मनामनामध्येरूजविण्याचे कार्य सुरू आहेत.

नांदुरा जपतो महाराजांच्या आठवणीबुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा खु. येथे श्री गुरूदेव सेवाश्रमाची स्थापनाकरण्यासाठी तुकडोजी महाराज जिल्ह्यात आले होते. महाराजांच्या पदस्पर्शानेपावन झालेल्या नांदुरा खु. येथील श्री गुरूदेव सेवाश्रमातून आजतत्वज्ञानाची शिकवण देण्याचे मोलाचे कार्य होत  असून बुलडाणा जिल्ह्यातीलनांदुरा आजही तुकडोजी महाराजांच्या आठवणी जपत आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार  सर्वसामान्यांपर्यंतपोहचविण्यासाठी श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे कार्य अखंडपणे सुरू आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ‘ग्रामगीता’ म्हणजे त्यांच्या मनात घरकरून राहिलेल्या गावाचे आणि ग्रामसंस्कृतीचे नितळ रूप आहे. ग्रामगीतेतीलविचार आपला विकास साधण्यासाठी एक मोठी देणगी आहे.- भगवान राईतकर,ग्रामगीता अभ्यासक, बुलडाणा.