शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबी बोंडअळीचा बुलडाणा जिल्हय़ात एक लाख शेतकर्‍यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 01:25 IST

​​​​​​​बुलडाणा:  गुलाबी बोंडअळीमुळे बुलडाणा जिल्हय़ातील १ लाख हेक्टरवरील कपाशी पिकाचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षण अहवालातून समोर आले असून, तब्बल १ लाख कापूस उत्पादक शेतकर्‍यांना याचा फटका बसला आहे. परिणामी जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना ५00 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या नुकसान भरपाईची गरज असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देजिल्हय़ाला ५00 कोटींपेक्षा अधिक नुकसान भरपाईची गरज!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  गुलाबी बोंडअळीमुळे बुलडाणा जिल्हय़ातील १ लाख हेक्टरवरील कपाशी पिकाचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षण अहवालातून समोर आले असून, तब्बल १ लाख कापूस उत्पादक शेतकर्‍यांना याचा फटका बसला आहे. परिणामी जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना ५00 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या नुकसान भरपाईची गरज असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.एक महिन्यापूसन गुलाबी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचा सर्व्हे  प्रत्यक्ष शेतावर जाऊन करण्यात येत असून, जीओ टॅगिंगसह तांत्रिक बाबींचा सर्व्हेमध्ये समावेश असल्याने उशीर होत आहे. दहा दिवसांमध्येच हा सर्व्हे करण्याचे निर्देश यंत्रणेला होते.  जिल्हय़ातील ३५0 कृषी सहाय्यकांसह गावातील तलाठी, ग्रामसेवक, गावातील सरपंच, उपसरपंच यांच्या समक्ष हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.  एक लाख ७५ हजार ५ हेक्टरवर यावर्षी कपाशीचा पेरा झाला आहे; मात्र गुलाबी बोंडअळीमुळे  बहुतांश कपाशीचे क्षेत्र बाधित झाले आहे. काही ठिकाणी त्याची तीव्रता अधिक आहे तर काही ठिकाणी त्याची तीव्र कमी आहे. त्याच्या आधारावर येत्या काळात शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणार आहे; मात्र त्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापन विभागातील सूत्रांनी व्यक्त केली. एक जानेवारीअखेर बुलडाणा जिल्हय़ातील  एकूण बाधित कपाशी क्षेत्रापैकी ९९ हजार ५२७.२४ हेक्टरवली सर्वेक्षण पूर्ण झाले असून, ९८ बजार ७४१ शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन कृषी विभागाने हा सर्व्हे केला आहे.

५00 कोटींच्या नुकसानाचा अंदाजबुलडाणा जिल्हय़ात आणखी काही दिवस हा सर्व्हे चालणार असून, शेतकर्‍यांचे बोंडअळीमुळे सुमारे ५00 कोटी रुपयांपेक्षाही अधिक नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागातील सूत्रांनी वर्तवला आहे. यासंदर्भातील अंतिम अहवाल अद्याप तयार झाला नसून, तो येत्या आठ दिवसात होण्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. दरम्यान, अद्याप जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांच्या संयुक्त सहीचा अहवाल तयार झालेला नाही. त्यामुळे अंतिम अहवालादरम्यान, कापसामुळे झालेल्या नुकसानाचा अंदाज बदलण्याची शक्यताही असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcottonकापूस