शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आधारासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:00 IST

शेतकर्‍यांचे मनोधैर्य वाढावे, आत्मविश्‍वास वाढावा, यासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्यावतीने ग्रामीण भागात एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमाद्वारे शेतकर्‍यांना वैचारिक व मानसिक आधार मिळावा, यासाठी मार्गदर्शन सभा घेण्यात येत आहेत.

ठळक मुद्देमराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेडचा संयुक्त उपक्रम 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : शेतकर्‍यांचे मनोधैर्य वाढावे, आत्मविश्‍वास वाढावा, यासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्यावतीने ग्रामीण भागात एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमाद्वारे शेतकर्‍यांना वैचारिक व मानसिक आधार मिळावा, यासाठी मार्गदर्शन सभा घेण्यात येत आहेत. या उपक्रमाला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे.जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. कधी अतवृष्टी, कधी गारपीट, तर कधी पिकांवर पडणारे रोग, यामुळे दिवसेंदिवस पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. जे काही थोड्याफार प्रमाणात पिकांचे उत्पन्न होत आहे, त्या पिकांना बाजारात पाहिजे तसा भाव मिळत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकर्‍यांची आर्थिक  परिस्थिती खालावली आहे. पिकांवर होणारा खर्चही निघत नाही, तर वर्षभर होणारा खर्च, मुलींचे लग्न, सुख-दु:ख यावर होणारा खर्च शेतकर्‍यांना शेतीच्या उत्पन्नातूनच करावा लागतो. एवढा खर्च शेतीच्या उत्पन्नातून भागत नसल्याने अनेक शेतकरी नैराश्यापोटी आत्महत्येचा मार्ग अवलंबित आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये जनजागृती व्हावी, शेतकर्‍यांनी  अथवा शेतकर्‍यांच्या मुलांनी  शेतीवरच अवलंबून न राहता इतर व्यवसायाकडे  वळावे, बाजारामध्ये जे विकते, तेच शेतीत पिकवा, पारंपरिक पिके बाजूला सारून बदलत्या परिस्थितीनुसार पेरणी करा, आत्महत्या करू नका, याबाबत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्यावतीने विलास तेजनकर, अशोक तुपकर, भास्करराव छबिले, प्रा. गजानन जारे, सुभाष म्हस्के, विकास तेजनकर, अतुल शिंदे, गजानन चेके, जे.पी. धांडे आदी पदाधिकारी हे ग्रामीण भागात जाऊन शेतकर्‍यांच्या सभा घेऊन जनजागृती करीत आहेत. आतापर्यंत चायगाव, वर्दडी, वडगाव माळी, कोयाळी सास्ते, अंत्री देशमुख, साब्रा, सोनाटी, सुकळी आदी गावांमध्ये सभा घेतल्या आहेत. - 

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड