शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक साहित्यावरही जीएसटीचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:41 IST

जीएसटीचा भार विविध शैक्षणिक साहित्यावर पडला  असून,  १२ ते १८ टक्क्याने शैक्षणिक साहित्याचे दर वाढले आहेत.  या नव्या कर प्रणालीमुळे पालकांना अर्थिक भुर्दंड बसत आहे. 

ठळक मुद्देफटका जीएसटीचा१२ ते १८ टक्क्याने शैक्षणिक साहित्याच्या किमती वाढल्या नव्या कर प्रणालीमुळे पालकांना अर्थिक भुर्दंड 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जीएसटीचा भार विविध शैक्षणिक साहित्यावर पडला  असून,  १२ ते १८ टक्क्याने शैक्षणिक साहित्याचे दर वाढले आहेत.  या नव्या कर प्रणालीमुळे पालकांना अर्थिक भुर्दंड बसत आहे. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून ते सत्र संपेपर्यंत विद्यार्थ्यांचे विविध  शैक्षणिक साहित्य खरेदी करणे सुरू असते. शाळेत होणारे  वेगवेगळ्या प्रयोग व उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य  आणावे लागते. शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांचा  पालकांकडे नेहमीच तगादा लावला जातो; परंतु १ जुलैपासून लागू  झालेल्या वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीमुळे शैक्षणिक साहि त्यावरही परिणाम जाणवत आहे. या नव्या वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे शैक्षणिक साहित्यांच्या करांमध्ये कमी जास्त प्रमाणात  बदल झाले आहेत. जीएसटीमुळे अनेक शैक्षणिक वस्तू महाग झाल्या  आहेत. मुलांच्या चित्रकलेच्या वह्या सोडल्या तर इतर अनेक साहि त्याचे दर वाढले आहेत. अभ्यास पुस्तिका, आलेख वही, प्रयोग वही,  साधे पेन, गणितीय साहित्य, भूमिती उपकरणे, कलर बॉक्स, पेन्सिल,  शॉपनर आदी साहित्यांवर १२ टक्के कर लावण्यात आला आहे.  फाउंटन पेन व शैलीलेखन पेन, साधे दप्तर याच्या किमती १८ टक् क्याने वाढल्या आहेत. तसेच लेदरच्या दप्तरच्या किमती २८ टक्क्याने  वाढल्या आहेत. यासह इतर शैक्षणिक साहित्यांच्या किमती वाढलेल्या  असतानाही आवश्यक असणार्‍या शैक्षणिक साहित्याच्या खरेदीवर  मात्र कुठलाच परिणाम जाणवत नाही. 

खाजगी शिकवणीवर १८ टक्के जीएसटीखाजगी शिकवणी वर्ग गल्लीबोळात निर्माण झाले असून वाढत्या  शैक्षणिक स्पर्धेबरोबर शिकवणी वर्गांचे प्रमाणही झपाट्याने वाढत  आहे. या खाजगी शिकवणीवरही १८ टक्के जीएसटी लावण्यात  आलेली आहे. तसेच खाजगी शिकवणींना आता जीएसटीमध्ये  नोंदणीकरून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिकृत शिकवणी  वर्गांबरोबरच इतर शिकवणी चालकांनीही जीएसटीच्या नावाखाली  आपले दर वाढवलेले आहेत.