शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा येथे सामूहिक सूर्यनमस्कार  : ३ हजार ७०० विद्यार्थ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 18:42 IST

बुलडाणा : स्थानिक जिजामाता व्यापारी क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा भारती यांचा संयुक्तविद्यमाने ९  फेब्रुवारी रोजी  सकाळी ७.३० वाजता ‘सामूहिक सूर्यनमस्कार’ प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम  घेण्यात आला.

ठळक मुद्देक्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा भारती यांचा संयुक्त उपक्रम. स्थानिक जिजामाता व्यापारी क्रीडा संकुल येथे सामूहिक सूर्यनमस्कार’ प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम  घेण्यात आला. जिल्हा अधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, स्काऊट गाईड, अशा विविध शासकीय घटकांनी यावेळी सहभाग नोंदविला.

बुलडाणा : स्थानिक जिजामाता व्यापारी क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा भारती यांचा संयुक्तविद्यमाने ९  फेब्रुवारी रोजी  सकाळी ७.३० वाजता ‘सामूहिक सूर्यनमस्कार’ प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम  घेण्यात आला.बुलडाणा शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, योग्य प्रशिक्षण केंद्रे, सर्वोदय योग्य साधना ग्रुप, आर्ट आॅफ लिविंग परिवार, योगांजली योग्य साधना केंद्र, आयुर्वेद महाविद्यालय अश्या विविध सामाजिक संघटना यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे ३ हजार ७०० विद्यार्थी व १ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. जिल्हा अधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, स्काऊट गाईड, अशा विविध शासकीय घटकांनी यावेळी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास आमदार हर्षवर्धन सपकाळ, जि. प. अध्यक्षा उमा तायडे, सभापती श्वेता महाले, योगेंद्र गोडे, जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी शिंदे तसेच क्रीडाभारतीचे राष्ट्रीय सहमंत्री प्रसन्न हरदास, जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील, श्रीकृष्ण शेटे, सदानंद काणे, बाळ अयाचित,  अंजली परांजपे, डॉ. उबरहांडे, प्रकाश लहासे, जेष्ठ योग्य मार्गदर्शक उबरहंडे, सर्व पत्रकार बांधव यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी उपक्रमास आर्थिक सहकार्य करणाºया संस्थेचे प्रतिनिधी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये योगेंद्र गोडे, डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय, स्टेट बँक आॅफ इंडिया, रिजिनल आॅफिस, ओमेगा सिस्टिम्स नाशिक, व्ही एम स्पोर्ट्स, शाकंभरी ट्रेडर्स आदींचा समावेश होता. या कार्यक्रमास क्रीडा अधिकारी कार्यालयाचे प्रशिक्षक इंगळे, अनिल कुलकर्णी, नितीन श्रीवास, आशिष चौबे आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana jilha krida sankulबुलढाणा जिल्हा क्रीडा संकूल