शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदांमध्ये अनुकंपा उमेदवारांच्या भरतीला हिरवी झेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 19:05 IST

सामान्य प्रशासन विभागाच्या ११ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयातील अ़नुकंपा तत्त्वावरील भरतीस ते निर्बंध लागू राहणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये सरळसेवेने रिक्त पदांची भरती थांबवली असली तरी त्या आदेशातील निर्बंध अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रीयेसाठी नाहीत, त्यामुळे अनुकंपा तत्त्वावर उमेदवारांची तातडीने भरती करून ती एकुण रिक्त पदांच्या २० टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने २६ आॅगस्ट रोजी दिला आहे. चालू वर्षात कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्याने अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच राज्य शासनाने विकास कामांवर खर्च होणारा निधी रोखला तसेच अखर्चित निधीही परत घेतला. त्याचवेळी शासकीय नोकर भरतीवरही निर्बंध लादले. त्यासाठी वित्त विभागाने ४ मे २०२० रोजी स्वतंत्रपणे शासन निर्णय काढला. त्यामध्ये १४ क्रमांकाच्या परिच्छेदात निर्बंधाचा उल्लेख होता. त्याठिकाणी आता ‘परंतुक’ दाखल करण्यात आले. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या ११ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयातील अ़नुकंपा तत्त्वावरील भरतीस ते निर्बंध लागू राहणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. वित्त विभागाने त्याबाबतचे शुद्धीपत्रक ३० जुलै २०२० रोजी प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी ही भरती प्रक्रीया तातडीने पूर्ण करावी, त्याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे पत्र ग्रामविकास विभागाने दिले आहे. या भरती प्रक्रीयेत अनुकंपाधारकांची भरती ही त्या वर्षातील एकुण रिक्त पदांच्या २० टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, याचीही खबरदारी घेण्याचे पत्रातून बजावले आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावBuldhana ZPबुलढाणा जिल्हा परिषद