शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आयडॉल स्पध्रेत औरंगाबादचा मुनावर अली ठरला महाविजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:20 IST

शहरी व ग्रामीण भागातील होतकरू कलाकारांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना कला सादर करण्यासाठी संधी देण्याबरोबरच सतत नावीन्य स्वीकारण्याचा अनोखा संगम साधणार्‍या बुलडाणा अर्बन परिवाराच्या कर्मचारी गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या बुलडाणा आयडॉल स्पध्रेच्या अंतिम सोहळ्यात औरंगाबादच्या मुनावर अली याने महाविजेता होण्याचा मान मिळविला.

ठळक मुद्देबुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचा उपक्रमहोतकरू कलाकारांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ ११,१११ रुपयांचा धनादेश देऊन मुनावरला गौरविण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरी व ग्रामीण भागातील होतकरू कलाकारांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना कला सादर करण्यासाठी संधी देण्याबरोबरच सतत नावीन्य स्वीकारण्याचा अनोखा संगम साधणार्‍या बुलडाणा अर्बन परिवाराच्या कर्मचारी गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या बुलडाणा आयडॉल स्पध्रेच्या अंतिम सोहळ्यात औरंगाबादच्या मुनावर अली याने महाविजेता होण्याचा मान मिळविला.शहरी व ग्रामीण कलारसिकांच्या साक्षीने आणि प्रेक्षकांनी खचून भरलेल्या गर्दे वाचनालयाच्या सभागृहात सोमवारी रात्री बुलडाणा आयडॉल स्पध्रेच्या महाअंतिम (ग्रॅण्डफिनाले) सोहळ्याची अत्यंत जल्लोषात व उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. आयडॉल स्पध्रेमध्ये औरंगाबादच्या मुनावर अली याने स्पध्रेच्या तीनही फेरीत उत्कृष्ट कामगिरी करीत प्रथम बाजी मारून महाविजेते पदाचा किताब मिळविला. यावेळी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी, संस्थेचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुकेश झंवर, उपाध्यक्ष राजेश देशलहरा, अँड.जितेंद्र कोठारी,  राजेंद्र काळे यांच्या हस्ते मुनावर अलीला ११ हजार १११ रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पध्रेत किशोर राजपूत यास द्वितीय, तर o्रद्धा वानखेडे व शिवदास साठे यांना तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले. या स्पध्रेत किशोर दिवटे, दीपक राऊत, श्याम शिंदे, भाग्यo्री इंगळे, एस.एस. नृपनारायण, अनिल माकोडे, रोशनी गेडाम, तेजस नाईक, मुकुंद सूर्यवंशी, कविता वरघट, भगवान बाभूळकर यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. प्रारंभी भारतमाता पूजन व दीपप्रज्वलनानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, संस्थेचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुकेश झंवर यांच्या हस्ते महाअंतिम सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजेश देशलहरा, परीक्षक उमेश अंजनकर, गजानन सोनवणे, सिफनी ग्रुपचे सचिन मुंढे उपस्थित होते. नरेंद्रसिंग राजपूत व चंद्रशेखर जोशी यांनी संचालन केले. यशस्वीतेसाठी संस्थेच्या अध्यक्ष कोमल झंवर, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुकेश झंवर, अनंताभाऊ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गजानन चवरे, उपाध्यक्ष प्रीती कोलारकर, सचिव संजय कुळकर्णी, मंडळाचे सर्व कार्यकारिणी सदस्य व संस्थेच्या कर्मचार्‍यांनी परिo्रम घेतले.